• Mon. Nov 25th, 2024

     ‘सुपर स्पेशालिटी’तील यंत्रणेचे कार्य कौतुकास्पद – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 30, 2022
     ‘सुपर स्पेशालिटी’तील यंत्रणेचे कार्य कौतुकास्पद – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे – महासंवाद

    अमरावती, दि. 30 (विमाका) : किडनी प्रत्यारोपण शस्त्रकियेसाठी बाहेरील यंत्रणेवर अवलंबून न राहता अमरावतीतच स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने सुसज्ज यंत्रणा विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात निर्माण झाली आहे. हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे काढले.

    विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे आतापर्यंत किडनी प्रत्यारोपणाच्या 15 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यातील पंधरावी शस्त्रक्रिया बाहेरील टीमची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने यशस्वी झाली. याबद्दल रुग्णालयातील डॉक्टर, स्थानिक तज्ज्ञ, पारिचारिका, परिचर व सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, वैद्यकीय अधिक्षक अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. राहुल घुले, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. सुधीर धांडे, डॉ. उमेश अग्रवाल आदी उपस्थित होते. आपल्या मुलाला किडनीदान करून त्याचे प्राण वाचविणाऱ्या किरण अशोक नंदागवळी या मातेचा व यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतणाऱ्या सोमेश्वर अशोक नंदागवळी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

    डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, किडनी प्रत्यारोपणासाठी स्थानिक स्तरावरच सुसज्ज यंत्रणा निर्माण झाल्याने एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे. रुग्णालयातील स्टाफ व स्थानिक तज्ज्ञांचा समन्वय आणि सहकार्य कौतुकास्पद आहे. याचअनुषंगाने अवयवदानाबाबतही अधिकाधिक जनजागृती व्हावी जेणेकरून गरजू रुग्णांची वेळेत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊन त्यांचे प्राण वाचतील.

    अमरावतीचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणारे राज्यातील एकमेव शासकीय संदर्भ सेवा रुग्णालय असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. डॉ. सौंदाळे, डॉ. नरोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. समाजसेवा अधिक्षक सतीश वडनेरकर यांनी सूत्रसंचालन केले.

    यावेळी डॉ. सोनाली चौधरी, डॉ. माधवी कासदेकर, डॉ. नयन चौधरी, डॉ. रेणुका वडदेकर, डॉ. प्रणिता घोणमोडे, डॉ. पूर्णीता वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. रोहित हातगावकर, डॉ. स्वाती शिंदीकर, डॉ. जफर अली, डॉ. प्रणित काकडे, डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. स्वप्नील मोळके, मेट्रन चंदा खोडके, माला सूर्याम, ज्योती काळे, अनिता मडके, कविता बेरड संगीता अष्टीकर, दुर्गा घोडिले, निमा कांडलकर, निकिता बागडे तेजस्विनी वानखडे, आशा बानोडे, अर्चना डोंगर, जमुना मावसकर किरण अष्टेकर, प्राजक्ता देशमुख, यमुना दामले, भारती घुसे, अभिजीत देवधर, सुनीता हरणे, कांचन वाघ, नंदाताई, अविनाश राठोड, आशिष स्थूल, ज्ञानेश लांजेवार, आकाश साळवे, शंकर जारे, गजानन मातकर, सुनीता ठाकूर, जीवन जाधव, सागर गणोरकर, शिवा भोंगाडे,अमोल वाडेकर, पंकज बेलूरकर, विजय मोरे, अंजली दहाट, शीतल बोंडे आदी उपस्थित होते.

              ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed