• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

    ByMH LIVE NEWS

    Sep 29, 2022
    मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

    मुंबईदि. 29 :- मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

    मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टच्या २९ हजार कर्मचाऱ्यांसहशिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

    विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे‘ असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,’ असे आवाहन केले.

    बैठकीस खासदार राहुल शेवाळेमुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहलअतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडेमाजी आमदार किरण पावसकर,  महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडेशशांक रावसंतोष धुरीउत्तम गाडेअशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेकोविडच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात राखण्यात डॉक्टर्ससर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांवर खर्च झालाच पाहिजे. पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहनही मिळाले पाहिजे. विकास काम आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना यांचा समतोल राखावा लागेल. कर्मचारी आणि नागरिक आपलेच आहेत.

    दिवाळी बोनसची घोषणा करतानाच मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडविल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदारगुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी,’असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    बैठकीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची श्रमसाफल्य‘ आणि आश्रय‘ या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

    दिवाळी बोनसची मागणी आणि त्यातील वाढीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वपक्षीय कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन बैठक घेतली. त्याबद्दल आणि बोनससाठी विविध घटकांचा सहानुभूतीने विचार केल्याबद्दल उपस्थित संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed