• Sun. Sep 22nd, 2024

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ३० वे आशीर्वाद राजभाषा पुरस्कार प्रदान

ByMH LIVE NEWS

Sep 20, 2022
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ३० वे आशीर्वाद राजभाषा पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 20 : केवळ हिंदीच नव्हे, तर देशात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भारतीय भाषा या राष्ट्रीय भाषा  आहेत. सर्वच भाषा या भारतमातेच्या कन्या आहेत. त्यामुळे सर्व भाषांचा सन्मान केला तर तो हिंदी भाषेचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

‘आशीर्वाद’ या हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणाऱ्या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे ’30 वे आशीर्वाद राजभाषा पुरस्कार’ तसेच उकृष्ट गृहपत्रिका पुरस्कार राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कुलपती या नात्याने आपण प्रत्येक विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात सूत्रसंचालन इंग्रजी भाषेत न करता मराठी भाषेत करण्याबद्दल आग्रही राहिलो. मराठी भाषा शिकण्यासदेखील सोपी आहे, असे आपण स्वतः अनुभवले. हिंदी भाषा अनायासेच वाढत आहे व परदेशात गेल्यावर तर भारतातील सर्व राज्यातले लोक हिंदीतच संवाद साधतात, असे राज्यपालांनी सांगितले.

अनेक गृहपत्रिकांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत असून सार्वजनिक उपक्रम तसेच सरकारी संस्थांमध्ये अनेक प्रतिभावंत अधिकारी असल्याचे दिसून येते, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी हिंदी प्रचाराचे कार्य करणारे केंद्रीय कार्यालय – मध्य रेल्वे, रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (नौसेना), राष्ट्रीय औद्योगिक इंजिनियरी संस्थान (नीटी), राष्ट्रीयीकृत बँक – भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र, सार्वजनिक उपक्रम – भारतीय जीवन विमा निगम, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत पेट्रोलियम व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सर्वोत्तम राजभाषा कार्यान्वयन पुरस्कार नराकास, मुंबई उपक्रम, अध्यक्ष हिंदुस्थान पेट्रोलियम यांना देण्यात आला.

यंदापासून श्रेष्ठ मूळ साहित्यिक कृतीसाठी देण्यात येणारा स्वर्गीय डॉ.अनंत श्रीमाळी स्मृती पुरस्कार डॉ. सुलभा कोरे, सहायक महाप्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडिया यांना देण्यात आला.

दिनेश पारधी, भारतीय स्टेट बँक, पार्श्वगायिका कविता सेठ व सुप्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट अंकुर झवेरी यांना देखील आशीर्वाद राजभाषा गौरव पुरस्कार देण्यात आले.

अंबर (केंद्रीय कापूस प्राद्योगिकी संशोधन संस्था), युनियन सृजन (युनिन बँक ऑफ इंडिया), विकास प्रभा (आयडीबीआय बँक), रेल दर्पण (पश्चिम रेल्वे), जलतरंग (माझगाव डॉक), प्रयास (भारतीय स्टेट बँक) व प्रेरणा (द न्यू इंडिया अशुरन्स कंपनी) यांना उत्कृष्ट गृहपत्रिका पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाला आशीर्वाद संस्थेचे मानद अध्यक्ष बृजमोहन अग्रवाल, डॉ. उमाकांत बाजपेयी, नीता बाजपेयी, ज्युरी पत्रकार डॉ.वागीश सारस्वत, अध्यक्ष सुधा सिंह, उपाध्यक्ष डॉ. बनमली चतुर्वेदी, अरविंद राही, राजेश मिश्रा आदी उपस्थित होते.

००००

Governor Koshyari presents Ashirwad ‘Raj Bhasha awards’

to central govt offices, banks, PSUs

Best House Magazine awards presented

Mumbai 20th Sept : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 30th Ashirwad Raj Bhasha Awards for 2022 at a function held at Raj Bhavan Mumbai on Tuesday (20th Sept).

The awards instituted by social, cultural and literary organisation Ashirwad were given away to selected Central Government offices, nationalized banks and Public Sector Undertakings for promoting Hindi through their work.

President of Ashirwad Brujmohan Agrawal, social worker Manju Lodha, Dr Umakant Bajpayi, Nita Bajpayi, Jury Dr Vageesh Saraswat, Sudha Singh, Dr Banmali Chaturvedi, Arvind Rahi and Rajesh Mishra were prominent among those present.

Central Railway, Principal Controller of Defence Accounts (Navy), National Institute of Industrial Engineering (Central offices category), SBI, Central bank of India, Union Bank of India and Bank of Maharashtra (Nationalized banks category), LIC, Nuclear Power Corporation of India, BPCL, Rashtriya Chemicals and Fertilizers (PSU category) and Hindustan Petroleum were given the Raj Bhasha Puraskars. Dr Sulabha Kore, AGM, Union Bank of India was given the late Dr Anant Shrimali memorial award)

House magazines Ambar, Union Srujan, Vikas Prabha, Rail Darpan, jaltarang, Prayas and Prerana were given the Best House Magazine awards.

Dinesh Parudhi, GM State Bank of India, Playback singer Kavita Sheth and Voice artist Ankur Chaudhari were given the Raj Bhasha Gaurav Puraskars.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed