• Mon. Nov 25th, 2024

    गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

    ByMH LIVE NEWS

    Sep 10, 2022
    गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

    मुंबई, दि. 10 : गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे 400 सभासद एनसीसीमधील 1500 मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते.

    गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला.

    या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे एन. बी. मोटे राज्य चिटणीस (अ.का.) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणमैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन स्काऊट्स आणि गाईड्स राज्य संस्थेच्या वतीने करण्यात येत असते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed