prevent river pollution: गणेश विसर्जनाच्या वेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा होतो. हेच नदी प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य संकलनासाठी केंद्रे उभारण्यात आली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,बदलापूर:गणेश विसर्जनाच्या वेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात फुले, हार, तसेच पूजेचे साहित्य टाकले जात असल्याने जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. हा धोका लक्षात घेऊन डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही उल्हास नदी संवर्धनासाठी निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित केले आहे.
निर्माल्य संकलन केंद्रे
बदलापूर पूर्व येथील उल्हास नदी चौपाटी, खरवई, वांगणी येथील कुडसावरे, अंबरनाथमधील कैलास नगर, तसेच उल्हासनगरमधील मानेरे गाव परिसरातील विविध विसर्जन घाटांवर प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी निर्माल्य संकलन केंद्रे उभारली होती. गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना निर्माल्य नदीत न टाकता या केंद्रांवर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांमध्ये जनजागृती
या उपक्रमात सुमारे ३०० ते ३५० श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भाविकांची मोठी गर्दीअसतानाही सदस्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने संकलनाचे काम पार पाडले. निर्माल्य नदीपात्रात टाकल्याने होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करत नदी संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
Maharashtra Dams: राज्यातील धरणं कोरडीच! गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात 11.65 टक्क्यांची घट, कोणत्या धरणात किती पाणी?
सेंद्रिय खत तयार करणार
संकलित निर्माल्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. या खताचा वापर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीसाठी केला जाणार आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रमराबविण्यात आला.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा