• Wed. Sep 16th, 2026

Murlidhar Mohol: मंत्र्याच्या ताफ्याला कट मारणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा, तर दगडूशेठ परिसरातील गर्दीत व्हीआयपी ताफा घुसवणाऱ्यांवर काय? पुण्यात नवा वाद

पुणे : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षेतील ताफ्याला ओव्हरटेक करून कट मारल्याप्रकरणी एका दुचाकीस्वारावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विद्युत रोषणाईच्या उद्घाटनावेळी गर्दीच्या रस्त्यावर थेट मोहोळ यांच्या चार गाड्यांचा व्हीआयपी ताफा आणून भाविकांना वेठीस धरणाऱ्या मंत्र्यांच्या ताफ्याबाबत पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “सर्वसामान्यांनी ताफ्याला ओव्हरटेक केला म्हणून तात्काळ गुन्हा दाखल होतो, मग गर्दीच्या ठिकाणी ताफा घुसवून जनतेला वेठीस धरणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार?” असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचा ताफा संचैती चौकातून जात होता. त्यावेळी अंगरक्षक कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक/सहा. पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले (वय ५०) यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी नाना पेठेतील शुभम विजय वनित (वय ३२) याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंदवून नोटीस बजावली आहे. आरोपीने दुचाकी अतिशय बेदरकारपणे आणि वेडीवाकडी चालवून मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मंत्र्यांच्या वाहनाला कट मारल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दुसरीकडे, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विद्युत रोषणाई उद्घाटनासाठी मोहोळ आले असता, संध्याकाळी ७ ते ८ च्या सुमारास मध्यवर्ती भागातील प्रचंड गर्दीत त्यांच्या चार गाड्यांचा ताफा थेट घुसला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पायी चालणेही कठीण असताना, एवढ्या गर्दीच्या ठिकाणी मंत्र्यांनी गाड्यांचा ताफा आणल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आणि पायी जाणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

एकीकडे मंत्र्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला म्हणून सर्वसामान्य तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल केला जातो, तर दुसरीकडे त्याच व्हीआयपी संस्कृतीमुळे रस्त्यावरील शेकडो नागरिक तासनतास वेठीस धरले जातात; या दुटप्पी भूमिकेवरून सध्या पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी आणि चर्चा रंगली आहे.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed