Kalyan Crime News : एका 22 वर्षीय विवाहित तरुणीने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम भागात राहणाऱ्या एका 22 वर्षांच्या पीडित विवाहित तरुणी हिचा पतीसोबत वाद असल्यानं त्या वादात मध्यस्थी करण्यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यानंतर 13 सप्टेंबर गुरुवारी रोजी माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा साथीदार बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे आपल्या खासगी फार्महाऊस येथे आणलं. तेथे तिला शस्त्राचा धाक दाखवून आणि दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. अत्याचारच्या रात्री दोन वाजता माजी आमदार नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील यानेसुद्धा या पीडीत तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटील यांच्या घरचा केअरटेकर याने पीडित तरुणीला तिच्या घरी आणून सोडलं.
Jhiram Ghati Case : काँग्रेसची अवघी फळी संपवणाऱ्या जिरम घाटी प्रकरणाचा अखेर निकाल; पण हल्ल्यातील ‘मास्टरमाइंड’ कारवाईच्या कक्षेबाहेर!
काँग्रेस नगरसेविका यांना सांगितली घटना
घडलेल्या प्रसंगाने भयभीत झालेल्या विवाहित पीडित तरुणीने काल बुधवारी रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे घडलेला प्रसंग सांगत मदत मागितली. तेव्हा तरुणीने आपल्यावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील याने अत्याचार केल्याचं व त्यासंबंधी आपल्याकडे व्हिडिओ व मोबाईल व्हॉट्सॲप चॅट असल्याचं दाखवलं. त्यानंतर पीडित तरुणीला घेऊन रात्री कांचन कुलकर्णी पडघा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ‘पोलिसांनी मला आता न्याय द्यावा. यांनी अशा पद्धतीने किती महिलांचं आयुष्य उध्वस्त केलं असेल, त्यामुळे यांना कठोर शिक्षा द्यावी’, अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.
व्हिडिओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर तक्रार दाखल
नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी सांगितलं की, ‘पीडित तरुणीने माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील मोबाईलवर संपर्क साधून मदत मागितली. मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद कहाणी सांगितली, ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन हादरली. तिच्याजवळील व्हिडिओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पीडित तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना रात्री संपर्क केल्यानंतर त्यांनी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिर यांनी रात्री उशिरा सर्व खातरजमा करून शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे’.
Pune Crime : 23 वर्षीय मुलीचा पळून धर्माबाहेर विवाह, पित्याने पुणे गाठलं, लेक-जावयाला उचलून लॉजवर नेलं, बापासह पोलिसाला अटक
‘ही घटना अत्यंत निंदनीय काळिमा फासणारी असून देशात आणि राज्यात लाडकी बहीण म्हणून ढिंडोरा पिटणाऱ्या भाजपचा माजी आमदार अशा पद्धतीने कृत्य करीत असेल तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर परदेशी महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तर स्वतःच्या आईला शस्त्राचा धाक दाखवून तिच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करून बळकावली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. यांना 48 तासांत अटक न झाल्यास हजारो महिलांसोबत पडघा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करू’, असा इशारा काँग्रेस नगरसेविका तथा गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.
आरोपींचा शोध सुरु
दरम्यान, यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पकंज गिरी यांच्याशी संपर्क साधला असता माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा मित्र बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेला शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून या गुन्ह्याच्या आधारे पोलीस पथकाने तपास सुरू करत दोन्ही आरोपींचा शोध सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
