मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मुंबईत येऊन शांततेत आंदोलन करु, असा शब्द देत असल्याचं म्हटलं आहे. जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मराठा नेत मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, मनोज जरांगे हे माझे भाऊ असून त्यांना मी घरी जेवणाचे निमंत्रण देते, असं म्हटलं होतं. मनोज जरांगे यांनी यानंतर अमृता फडणवीस यांच्या जेवणाचे निमंत्रण स्वीकारल्याचे म्हटलं होतं. भाऊ आता आरक्षणाची लढाई लढत असताना बहिणीकडे कसा जाणार? मात्र भाऊबीजेला नक्की जाणार असल्याचं म्हटलं होतं. मनोज जरांगे यांच्या या भूमिकेनंतर अमृता फडणवीस यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली होती. “सध्या सणाचे दिवस असल्याने मला विश्वास आहे की, माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अमृता ताईंकडून आम्हाला दयेची अपेक्षा आहे. आजही ताईंना शब्द आहे, मी शांततेतच आंदोलन करणार. त्यांचं एक जेवण्याचं वाक्य आम्ही स्वीकारलेलं आहे. त्यांनी स्वच्छ मनाने सांगितलेलं आहे. भाऊबीजेचं निमंत्रण आम्ही स्वीकारलेलं आहे. त्यांच्या वाक्यात खुन्नस नाही. टोचून त्या बोललेल्या नाहीत. ताईंना शांततेत आंदोलन करू, असा आमचा शब्द आहे. त्या चांगल्या बोललेल्या असताना आम्ही वाईट बोलणार नाहीत. आमच्यावर देखील चांगले संस्कार आहेत, वाईट नाहीत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम
“न्यायदेवतेचा सगळा सन्मान करून मी मुंबईत उपोषणाला बसणार. मी कायद्याला मानतो. आपण अर्ज केलेला आहे. परवानगी द्यायची की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. ते कायद्याला न्यायदेवतेला मानत असतील तर परवानगी देतील. मी कायद्याचं उल्लंघन केलं आहे का? तुम्ही परवानगी दिली नाही याचा अर्थ तुम्ही न्यायदेवतेला मानत नाहीत. हे वाट बघतात मग परवानगी देतात. परवानगी द्यायला उशीर का? आम्ही मुंबईच्या पायथ्याला जाऊन थांबणार”, असं जरांगे म्हणाले.
“एक वेळ वाशीवरून परत येऊन आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. मराठ्यांचे प्रश्न निकाली लागले आणि माझे तसेच फडणवीस यांचे संबंध चांगले झाले तर शिंदे सेनेचं काय होणार? मग तुमचा बाजार उठेल. शिंदे आणि माझे संबंध चांगले झाले तर मग तुझं कसं होणार?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी सरकारची बाजू घेणाऱ्या मराठा नेत्यांना केला आहे.
“उपोषण कायम सुरु राहणार. मुंबईत देखील उपोषण कायम ठेवूनच जाणार. मला मरण आलं तरी घेणार. मी समाजासाठी फक्त जीव देऊ शकतो. प्रामाणिकपणा शेवटपर्यत कायम ठेवणार आहे. मरताना शेवटचा शब्द मराठ्याच्या लेकरांचं कल्याण करा हा शब्द बोलूनच मी जीव सोडीन”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
मनोज जरांगे यांचं विखे पाटील यांना प्रत्युत्तर
“तुम्हाला 3 वर्ष वेळ दिलं आहे. तुम्ही समाजाचं खूप नुकसान केलं. आम्ही तुम्हाला या म्हणून कधीही म्हणालो नाहीत. आता तुमहाला मराठे मतदान करणार नाहीत असं म्हटलो तर कसं होईल? आमच्या भावनेची कदर करून काही फायदा नाही. तुम्ही सातारा संस्थानसाठी 1 वर्ष वेळ मागितला. आम्ही दिला. पण तुम्ही लागू केलं नाही”, असं जरांगे म्हणाले.
“MPSC विद्यार्थींचे प्रश्न सोडवले नाहीत. तुम्ही जीआर लागू केले नाहीत. तुम्ही केसेस मागे घेतल्या नाहीत. एक वर्ष संधी देऊनही तुम्ही काहीही केलेलं नाही. 9 सप्टेंबरला तुम्ही जसा जीआर काढला तसा मराठा समाजासाठी काढा. मराठवाड्यातील सर्व मराठा हा कुणबी आहे, असा जीआर काढा. 9 सप्टेंबर रोजी तुम्ही वैश्यवाणी समाजासाठी काढला आहे तसा आमच्यासाठी काढा”, अशी मागणी जरांगे यांनी केली.
जरांगेंची मुंबई पोलिसांच्या परवानगीवर प्रतिक्रिया
“सण उत्सवच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी निर्माण झालेले आहेत. लोकमान्य टिळकांचा अवमान तुम्ही करू नका. आम्ही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी येत आहोत. सगळे मराठे दर्शनाला आल्यानंतर गर्दी होणार नाही का? सणाच्या नावाखाली अन्याय करू नका. सणच आमचा आहे. गेल्यावर्षीही गणेशोत्सव होता. जाळपोळ दंगली झाल्या का? आमच्या पोरांनी मुंबईत फक्त देखावे केले. परंपरा दाखवत होते. पोलीस दुजाभाव करू शकत नाही. काहीही बतावण्या करू नका”, असं जरांगे म्हणाले.
“जर तरला काही अर्थ नाही. त्याचं काही विचारू नका. वर्षभर वेळ देऊनही त्यांनी आमचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे मुंबईत नाही तर मग कुठे आंदोलन करणार? सरकारच्या शब्दावर भळभळणारा मी नाही. मी कणखर आहे. लढणारा जरी मेला तरी जास्त द्वेषाने लढा. पळू नका. कोंडाणा किल्ल्याची आठवण समोर ठेवा. लढणारा मेला तर पळू नका. पळण्याचा इतिहास पुसून लढण्याचा इतिहास निर्माण करा. लढणारा मेला तर जास्त लोक पेटतात. असा इतिहास तयार करा. सरकारचा भ्रम दूर करा. ज्यांना मुंबईत यायचं नाही त्यांनी आम्हाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर यावे आणि शांततेत आंदोलन करायचे”,असं आवाहन जरांगे यांनी केलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा