• Sun. Sep 13th, 2026

Bhandara Accident: भंडाऱ्यात आयशर ट्रकला कारची जोरदार धडक; अपघातात 8 जणांचा जागीच अंत, 13 गंभीर जखमी

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळील मुंडीपार येथे शुक्रवारी पहाटे आयशरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून तीन जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

द्वारका पेट्रोलपंप येथून ट्रकचालक अमरसिंह रामदुलारे यादव (वय ३७, रा. उत्तर प्रदेश) हा महामार्गावर येत होता. लाखनीच्या दिशेने प्रवासी घेऊन बोलेरो निघाली होती. अचानक ट्रक समोर आल्याने बोलेरो त्यावर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती, की बोलेरोमधील पाच महिला आणि तीन बालकांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. जामबाई रामावतार वर्मा (५०, रा. एकतानगर, भांडेवाडी, नागपूर), मीनाक्षी राजकुमार वर्मा (२६, रा. बिचारपूर, लोहारा, छत्तीसगड), गायत्री रूपेश उईके (३०, रा. चिचोला, राजनांदगाव, छत्तीसगड), स्विटी रूपेश उईके (६, रा. चिचोला, राजनांदगाव, छत्तीसगड), धैर्य रूपेश उईके (४, रा. चिचोला, राजनांदगाव, छत्तीसगड), सरिता विजय वर्मा (३०, रा. बिचारपूर, लोहारा, छत्तीसगड), ग्रीशा राजकुमार वर्मा (२, रा. बिचारपूर, लोहारा, छत्तीसगड) आणि राजकुमारी प्रल्हाद पटेल (३५) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Buldhana Crime: स्मशानभूमीचा वाद पेटला; बुलढाण्यातील शेवग्यात तुफान हाणामारी, पाच जण गंभीर जखमी, 40वर गुन्हेजखमींमध्ये सुभाष विजय वर्मा (५), गुलशन रमेश वर्मा (१८), ललिता योगेश पटेल (२६), तन्मय योगेश पटेल (३), गणेशिया अश्वंत पटेल (२२), रमय्या खोजलर पटेल (२१), रामप्यारी भारत पटेल (४५), मयंक योगेश पटेल (६), रितेश विजय वर्मा (३), मेघा राजकुमार वर्मा (३), लोकेश असवन पटेल (९), डॉली असवन पटेल (७) (छत्तीसगड) आणि रामकुमारी दुलारी पटेल (३०) यांचा समावेश आहे.

Maharashtra TimesCrime News: दिवसाढवळ्या थरार! मेडिकलमध्ये घुसून २२ वर्षीय तरुणाला संपवलं, तरण्याबांड मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला धक्काया घटनेत ट्रकचालक अमरसिंह रामदुलारे यादव, चालक जग्गू उर्फ जयदेव निर्मल वर्मा आणि पेट्रोलपंपचालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे, लाखनीचे पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed