एमपीएससी पेपरफुटीविरोधातील आंदोलनाची धग संपूर्ण राज्यभरात पसरली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी एमपीएससी पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू ये=आहेत. कोल्हापुरात झालेल्या आंदोलनात २४ वर्षीय विवेकानंद पाटील याचे भाषण तुफान गाजले. विवेकानंद हा शेतकरी कुटुंबातील असून त्याने राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. विवेकानंदच्या व्हायरल भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्याचे कौतुक केले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी त्याची दखल घेतली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि पेपरफुटीची चौकशी करण्याची मागणी विवेकानंद यांनी केली आहे.