• Sat. Sep 12th, 2026

Mumbai- Sawantwadi Train: तिकिटाचे पैसे पूर्ण घेऊन प्रवाशांना किमान स्वच्छ आणि वापरण्यायोग्य डबे देण्याची जबाबदारी रेल्वेची असताना, या गाडीची अवस्था पाहता कोकणवासीयांची घोर निराशा झाली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : फाटलेली आसने, झिजलेले कव्हर, डब्यात सर्वत्र कचरा, बंद खिडक्या… नवीन म्हणून सुरू करण्यात आलेल्या मुंबई-सावंतवाडी या गाडीतील हे विदारक दृश्य. गणेशोत्सवासाठी उत्साहाने निघालेल्या कोकणवासीयांची या गाडीने पुरती निराशा केली आहे. गाडीचा व्हिडीओ समाज माध्यमावर जोरदार व्हायरल झाला आहे.

दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मुंबई-सावंतवाडी नवी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, नव्याने सुरू केलेल्या एक्स्प्रेसची अवस्था पाहता ‘नवी गाडी’ केवळ नावालाच असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

Maharashtra TimesMumbai Crime: मुंबईत फुकट्या प्रवाशाचा टीसीवर हल्ला; भुवईखाली सात टाके, डोळा थोडक्यात बचावला, आरोपी अटकेतसामान्य डब्यांतील अनेक आसने फाटलेल्या अवस्थेत असून त्यावरील कव्हरही निघालेले आहेत. बहुतांश खिडक्यांना प्लायवूड किंवा पुठ्ठे लावून त्या बंद करण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे डब्यांमध्ये हवा आणि प्रकाशाचीही गैरसोय होत असल्याची तक्रार आहे. गणपतीच्या सणासाठी वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या वाट्याला अशा प्रकारची व्यवस्था यावी, याबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

व्हिडीओ सफाईपूर्वीचा
गाडी क्रमांक १५०८७ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी एक्स्प्रेस दररोज रात्री ११.५५ वाजता सावंतवाडीसाठी रवाना होते. ही गाडी १२५३३ गोमतीनगर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडीच्या लिंकवर चालवली जाते. सदर गाडीचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन रात्री ९.२० वाजता होते. १५०८७ एक्स्प्रेसच्या फलाट क्रमांक १५ वरील अंतर्गत अस्वच्छतेचा समाज माध्यमावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा गाडीची पूर्ण साफसफाई करण्यापूर्वीचा आहे. रेल्वेकडून गाडीची पूर्ण साफसफाई केल्यानंतरच ती प्रवासासाठी रवाना केली जाते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesMaharashtra Rain Alert: पुढील चार दिवस पावसाचे! राज्यात वादळी पावसासह विजांचा कडकडाट, IMDचा अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’गणपती विशेष रेल्वेच्या नावाखाली कोकणी जनतेची ही निव्वळ फसवणूक आहे. घाणेरडे डबे, नादुरुस्त व्यवस्था आणि जनावरांसारखा प्रवास. सणासुदीच्या दिवशी स्वतःच्या हक्काच्या गावी जाताना जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळतेय. ही थट्टा आता सहन करण्यापलीकडे गेली आहे.- शुभम करपे, प्रवासी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा