• Sat. Sep 12th, 2026

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil: नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह खड्डे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नशिक: जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या सरकारच्या वतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. पण जरांगे यांनी त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा न केल्याने त्या निराश झाल्या. जरांगे सध्या कुणालाच सोडत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट या सगळ्यांना शिव्या देतात. जरांगे यांची ही भाषा राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. जरांगे यांना सांगून सांगून सगळे थकले, आता मी काय बोलणार, अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे.

लोकशाहीत सगळ्यांनाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकार त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे. हे व्यवस्थेचे काम आहे. यंत्रणा योग्य-अयोग्य काय आहे ते पाहतील. लोकांना त्रास होणार नाही, हे पाहणे व्यवस्थेचे काम आहे. तरीही त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात काय होते, ते पाहावे लागेल, असे त्यांनी जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावर भाष्य करताना सांगितले.

फडणवीस, शिंदेंना शिव्या, महिला जिल्हाधिकाऱ्यांसमोर घाणेरडी भाषा, भुजबळांचा जरांगेंवर संताप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परदेशात केलेल्या इंग्रजी भाषणावर टीका होत आहे. त्यावर भुजबळांनी भाष्य केले. काही हेतूने आरोप करण्यात अर्थ नाही. त्यांचे स्वागत झाले आणि भाषण उत्तम झाले. वेगवेगळे लोक परदेशात जात असतात. मीसुद्धा गेलो आहे. आपण काय चांगले केले, हे सांगतो. शिंदे यांनी जे ‘अचिव्ह’ केले, त्याबद्दल मला आनंद आहे, अशा शब्दांत भुजबळांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबद्दल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत. अराजकीय संस्था आणि राजकारणाची भेसळ होता कामा नये. राजकीय पक्षाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, पण एमपीएससीसारख्या अराजकीय संस्थेने त्यात पडू नये, असे भुजबळ म्हणाले.

Maharashtra TimesNashik News : समृद्धी महामार्गावरील अपघातात 21 वर्षांचा तेजस ब्रेन डेड, अनावर दुःखातही गायकवाडांचा मोठा निर्णय, मुंबईपर्यंत एअर ग्रीन कॉरिडोरखड्डे भरण्याची इच्छाशक्ती प्रत्यक्षात आणा

शहरातील खड्डे बुजविणे हे फार कठीण नाही. सुदैवाने सध्या पाऊस उघडला आहे. त्यामुळे जास्त कंत्राटदार नेमा. चौकोन करून खड्डे भरा. इच्छाशक्ती प्रत्यक्षात आणा, असे भाष्य त्यांनी शहरातील खड्ड्यांवर केले. महापालिकेचे काम दुहेरी आहे. कुंभाचे काम वेगळे आणि रोजचे रस्ते, पाणी, कचरा हे कर्तव्य वेगळे. ते आयुक्तांनी नीट पार पाडावे, असा टोला भुजबळांनी आयुक्तांनी दिलेल्या आव्हानावर लगावला आहे. गणेशोत्सवात डीजे बंदीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा. मोठा आवाज केला तर देवाला लवकर समजते असे नाही. आवाज कमी ठेवा. लेझरने डोळे जाण्याचे प्रकारही बंद झाले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा