• Sat. Sep 12th, 2026

मुंबई : कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने चार अनारक्षित एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते सावंतवाडीदरम्यान १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत विशेष एक्स्प्रेस धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोडदरम्यान धावणारी गाडी क्रमांक ०१००९ अनारक्षित विशेष गाडी १२ आणि १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी (०१०१०) अनारक्षित विशेष गाडी १३ आणि १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोडहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या चार फेऱ्यांमुळे गणेशोत्सवाच्या आधी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना विशेषतः मोठा दिलासा मिळणार आहे.

Sawantwadi Express: बंद खिडक्या, फाटकी आसने; मुंबई- सावंतवाडी रेल्वेतील दुरवस्था, अस्वच्छतेने कोकणवासी त्रस्तकोणत्या स्थानकांवर थांबणार?

गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड आदी ठिकाणी थांबे आहेत.

जड वाहनबंदीच्या वेळेत बदल
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जड आणि अवजड वाहनांच्या बंदीच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. आता १९ राजी सकाळी ८ ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत १६ टनांवरील वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

Maharashtra TimesMumbai Crime: मुंबईत फुकट्या प्रवाशाचा टीसीवर हल्ला; भुवईखाली सात टाके, डोळा थोडक्यात बचावला, आरोपी अटकेत३८६ विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त एकूण ३८६ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय मध्य रेल्वेने ८ सप्टेंबरपासून मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन एक्स्प्रेसही सुरू केली आहे.

गणेशोत्सवादरम्यान मेट्रो रात्री उशिरापर्यंत

मुंबई : गणेशोत्सवातील १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेट्रोच्या सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. घाटकोपरहून शेवटची मेट्रो मध्यरात्रीनंतर १२.४० वाजता सुटणार असून वर्सोव्यात मध्यरात्री १.०३ वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वर्सोवा येथून घाटकोपरच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री १२.१५ वाजता सुटेल. घाटकोपरहून वर्सोव्याच्या दिशेने शेवटची मेट्रो रात्री १२.४० वाजता रवाना होईल. ही मैट्रो वर्सोवा स्थानकात रात्री १.०३ वाजता पोहोचणार आहे. गणेश विसर्जनाच्या काळात रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही वाढीव सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed