Thane News : कळवा रुग्णालयात जेवणात सापडले झुरळ;अन्नाचे नमुने FDA कडे रवाना ,डेळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणात आढळला हा प्रकार
Thane News : राज्यात ‘एफडीए’ची धडाकेबाज कामगिरी सुरू असाताना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांत जेवणात झुरळ सापडल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर अन्नाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,ठाणे:कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलनापूर्वी संबंधित रुग्णाची प्रशासनाकडून भेट घेण्यात आली नव्हती, तसेच घटनेची चौकशीही सुरू झाली नव्हती, अशी कबुली प्रशासनाकडून देण्यात आली.
अन्नपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न
२८ ऑगस्टच्या रात्री वॉर्ड क्र. ६मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळले होते. या प्रकारानंतर रुग्णालयातील अन्नपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले. मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात आंदोलन केले.
मनसे आक्रमक
आंदोलनानंतर डॉ. कदम यांनी संबंधित रुग्णाची भेट घेतली. तसेच डॉ. माळगावकर यांनी रुग्णाकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. संबंधित अन्नपुरवठादार ठेकेदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेने केली. यावेळी आकाश शिंदे, संदीप कडू, दिनकर फुलसुंदर, गौरव केलशीकर, सिद्धेश सिंग आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. ठिय्या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Thane Marathon :तब्बल सहा वर्षांनी झालेली ३२ वी ठाणे मॅरेथॉन ठरतेय वादाचं कारण ;विरोधकांनी प्रशासनाला धरलं धारेवर , ‘मॅरेथॉन’वरून टीकास्त्र
चौकशीचे आश्वासन
घटना घडून चार दिवस उलटले तरी संबंधित अन्नाचे नमुने अद्याप अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले नसल्याची बाबही समोर आली. पुढील दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. ‘रुग्णांच्या ताटात झुरळ सापडणे ही गंभीर बाब आहे. केवळ चौकशीचे आश्वासन नको, तर दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे,’ असा इशारा महिंद्रकर यांनी दिला.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा