शिवसेना कुणाची याबाबतचा ऐतिहासिक निर्णय अंतिम टप्प्यात असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खलबतं सुरू असल्याची चर्चा आहे. यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.