Pune Accident News: भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने मायलेकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे.
कंटेनरचालक सचिन यादव (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माधव नारायण चोपलवाड (वय ३२, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
Pune Crime : तळेगाव स्टेशन पार्किंग कारशेडमध्ये बारामतीच्या तरुणीसोबत सामूहिक कुकर्म, दोघा नराधमांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप
दक्षिण महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल प्रल्हाद चोपलवाड (वय २५), देवांश चोपलवाड (वय दीड वर्ष, दोघेही रा. नांदेड) आणि हरिदास उतलवाड दुचाकीवरून जात असताना कंटेनरने धडक दिली. त्यात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर हरिदास उतलवाड यांच्या कमरेवरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. निघोजे परिसरात भरधाव अवजड वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हॉर्न वाजवल्याने मारहाण
पिंपरी : चाकण येथे स्कूटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून सोळा वर्षीय मुलास लाथाबुक्यांनी व कड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. वैभव दिनकर भांगरे (वय २५, रा. चाकण, मूळ रा. संगमनेर) व त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन लक्ष्मण येरकर (वय २३, रा. नाणेकरवाडी, खेड) यांनी तक्रार दिली आहे. चाकण दक्षिण पोलिस तपास करीत आहेत.
Pune News : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, महिलेचा सभेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, जि.प. सदस्यावर गंभीर आरोप; पुण्यात काय घडलं?
सायबर फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी : स्वतःचे बँक खाते आरोपी साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास भाड्याने दिले. ही घटना महाळुंगे चाकण तळेगाव रोड येथे सहा नोव्हेंबर २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. अजय नेताजी सुतार (वय २५, रा. महाळुंगे गाव, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई समीर शब्बीर महात (वय २२) यांनी तक्रार दिली आहे.
