• Sat. Sep 12th, 2026

GenZ आंदोलनाचं भाजप आमदाराकडून समर्थन; अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर आशिष देशमुखांचा टोला

GenZ आंदोलनाचं भाजप आमदाराकडून समर्थन; अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर आशिष देशमुखांचा टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू झालेल्या जेनझी आंदोलनाची संपूर्ण देशाने दखल घेतली. तरुणांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागला. यानंतर भाजप आमदार आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या आंदोलनात युवक जिंकले हे चांगलंच झालं, असे आशिष देशमुख यांनी म्हटले. यावेळी देशमुखांनी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली. राजीनामा देणारे छातीठोकपणे राजीनामा देतात, असा खोचक टोला त्यांनी सत्तारांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed