तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने साताऱ्यातील कराडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एफडीएने घरात कृत्रिम दूध बनवणाऱ्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित दाम्पत्याकडे धक्कादायक साहित्य सापडलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज मोहीम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत दूध भेसळीचा पर्दाफाश करत राहत्या घरात कृत्रिम दूध दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडाकेबाज मोहीम सुरु आहे. त्याच अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कराड तालुक्यातील भेसळखोरांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत शामगाव (ता. कराड) येथील एका घरात कृत्रिम दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच घटनास्थळावरून भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे कराड तालुक्यातील दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.
एफडीएची धाड, संशयास्पद गोष्टी निदर्शनास
कराड तालुक्यातील शामगाव येथे कृत्रिम दूध तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकली असता महेश यशवंत फाटक (वय ४४) आणि स्वाती महेश फाटक (वय ३८) हे केशरी रंगाच्या किटलीत तीन लिटर आणि गुलाबी रंगाच्या किटलीत दोन लिटर म्हशीच्या दुधामध्ये रिफाइंड पामोलीन तेल आणि पांढऱ्या रंगाची संशयित पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आरोग्यास हानिकारक असलेल्या घटकांची भेसळ
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सुजाता कंपनीचा मिक्सर, त्याचे भांडे, सुमित कंपनीचा हँड ब्लेंडर तसेच भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, जप्त केलेले कृत्रिम दूध, पामोलीन तेल आणि पांढरी पावडर ही मानवी आरोग्यास अपायकारक आणि असुरक्षित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच कृत्रिम दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा खरेदीसाठी खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ओम डेअरीच्या संबंधितांशी संगनमत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली आहे.
मोठे मासे गळाला लागणार?
भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पामोलीन तेल आणि पांढऱ्या पावडरच्या पुरवठादाराची माहिती देण्यास आरोपींनी टाळाटाळ केल्याने या प्रकरणामागे मोठे भेसळीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता आहे . त्यादृष्टीने तपास सुरू आहे. भेसळयुक्त दूध स्वीकारणारे तसेच कच्चा माल पुरविणाऱ्या संबंधितांचाही शोध घेण्यात येत आहे. या कारवाईत उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, हवालदार महेश लावंड, बाळासो कोळेकर, सुनील पन्हाळे, अशोक पाटील तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल सुप्रिया इंगवले यांचा सहभाग होता.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा