• Mon. Jul 27th, 2026

    Thane Politics : ठाण्यात महायुतीत नाराजी, विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप

    Thane Politics : ठाण्यात महायुतीत नाराजी, विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप

    ठाण्यात महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं दिसत नाहीय. कारण विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप उपमहापौरांकडून करण्यात आला आहे. उपमहापौरांकडून याबाबत नाराजी व्यक्त करणारं पत्र महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेत शिवसेना – भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेच्या विविध कामांचा शुभारंभ संयुक्तरित्या करणे अपेक्षित आहे. या सोहळ्याचे निमंत्रण माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाकडून उचित वेळेत देणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता भाजप लोकप्रतिनिधी आणि सदस्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप भाजपच्या वतीने ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला. याबाबत पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले आहे. या सर्व प्रकल्पाचे पुन्हा भाजप पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत लोकार्पण करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

    ठाण्यात दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन हात नाका येथील वाहतूक सुधारणा प्रकल्प, वागळे इस्टेट येथील पाणीपुरवठा प्रकल्प तसेच कळव्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमांचे निमंत्रण शहरातील भाजपच्या आमदार आणि ठाणे महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्याने मला देण्यात आले नाही, असा आरोप पाटील यांनी पत्राद्वारे केला. यापूर्वीही कोपरी येथील प्रसुतीगृहाच्या उद्घाटनाच्याप्रसंगी भाजचे आमदार आणि पदाधिकारी यांना डावलण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे पाटील यांनी नमूद केले.

    विहित वेळेत निमंत्रण पाठवण्याची मागणी

    ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांचे हस्ते या प्रकल्पाचे पुन्हा उद्घाटन करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच भविष्यात विविध कार्यक्रमांची विहित वेळेत निमंत्रण द्यावे, असे नमूद करत पाटील यांनी माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या कामकाजावर खंत व्यक्त केली.

    वरिष्ठांच्या भूमिकेकडे लक्ष

    उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेदाची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. त्यावेळी वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी सामंजस्याने विषय हाताळले आहेत. यावेळी आता वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये आपापसात नाराजी व्यक्त केली जाते की तोडगा काढला जातो? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    खरंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात ठाण्यात सातत्याने वाद होताना दिसत आहे. एकीकडे मंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेत आहेत. तसेच भाजप ठाण्यात आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये राजकीय स्पर्धा सुरु असल्याचं बघायला मिळतं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा