Sanjay Raut on Devendra Fadnavis : देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव सुरु आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले
संजय राऊत काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले, की “विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले? अतिशय निर्घृणपणे, काठीला खिळे लावून लाठीचार्ज केला, अश्रूधूर सोडले, पोलिसांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग झाला, यावर संसदेत सरकारला प्रश्न विचारले जातील. एवढं सगळं होऊनही मोदी माफी का मागत नाहीत? आम्हाला कोणती कायद्याची भाषा शिकवली जाते? कोणत्या कायद्याने सार्वजनिक संपत्ती अदानींच्या घशात घातली?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
केंद्रीय मंत्र्यांची मुलं परदेशी शिक्षणाला
“देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे केंद्र सरकार नव्हे, तर संघाने नेमले आहेत. त्यांच्या नेतृत्वात काय शिक्षण दिलं जाणार हा सवालच आहे. किती केंद्रीय मंत्र्यांची, भाजपशासित मुख्यमंत्र्यांची, खासदारांची मुलं परदेशी विद्यापीठात शिकत आहेत, हे मोदींनी जाहीर करावं, त्यांची मुलं सुरक्षित वातावरणात परदेशी शिकत आहेत, उद्योग नोकरी करत आहेत. मात्र संघाच्या दृष्टीने बनवलेल्या अभ्यास पद्धतीत गरीबांच्या मुलांना शिकायला सांगताय. आधी तुमची मुलं इथे आणा, त्यांना इथे शिकायला लावा. आमची मुलं या बोगस शिक्षण पद्धतीत शिकत आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
Archita Rahar : प्रधानांचा राजीनामा, भाजप खासदाराच्या कन्येची आनंदात इन्स्टा पोस्ट, डिलीट करण्याची सूचना मिळताच म्हणाली, आता आईला फोन करतील
नेहरुंपासून शिक्षण पद्धत आधुनिक
“या देशाची शिक्षण पद्धती पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या काळापासून आधुनिकच आहे, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंह हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते. तंत्रज्ञानाचं युग नेहरु ते गांधींपर्यंत त्यांनीच आणलं. मात्र भाजपने आधुनिकता मारुन महाभारतकालीन शिक्षण पद्धतीत नेलं. आधीचे पंतप्रधान सुशिक्षित होते. त्यांनी देशात आयआयटी आयआयएम स्थापन केलं. तुम्ही काय केलंत गोशाळा? तरुणांना पकोडे तळायला सांगता, चहा विकायला सांगता” असा संतापही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Who Is The Next Union Education Minister? Ashok Chavan म्हणाले नांदेडला Ministry मिळाली तर आनंदच!
‘फडणवीसांना शिक्षण मंत्री करणार’
“नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वात टास्क फोर्स स्थापन केला आहे. पण ते काही करेपर्यंत मोदी सत्तेवर राहणार नाहीत. मोदींनी संघाचे स्वयंसेवक मंत्रिपदी नेमण्याचं काम सुरु केलं आहे. नीलेकणींना शिक्षण मंत्री करा. गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात. ते योग्य व्यक्ती आहेत. त्यांनाच शिक्षण मंत्री केलं जाईल, हे मी ठामपणे सांगतोय. ते कितीही नाही म्हणाले, तरी तेच पुढचे शिक्षण मंत्री आहेत. कुठे राहणं त्यांच्या हातात नाही. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणं त्यांच्या हातात नव्हतं. कमिश्नरचा तेव्हा हवालदार केला. मोदी-शहांनीच आदेश दिले की जमादार व्हा. भाजपमध्ये स्वाभिमान किंवा मेरीट आहेच कुठे. या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल, तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव सुरु आहे. आम्ही मनकवडे आहोत.” अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
Sanjay Jadhav : साथ सोडली, नाराजी मांडली, तरी म्हणतात उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! ठाकरेंना सोडणाऱ्या संजय जाधवांच्या पोस्टने आश्चर्य
“मोदींनी कुठला ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यासाठी त्यांचे आभार मानले जात आहेत. राजीनामा घेणं गरजेचं होतं असं भाजप कार्यकर्त्यांनाही वाटतं का? त्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी बलिदान दिलं, २० जणांनी जीव दिला, अनेकांची डोकी फुटली, मुलींचे विनयभंग झाले. तुम्ही भररस्त्यात मुलींचे कपडे फाडले, वस्त्रहरण केलं.” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
