Pune News: घरपोच पोषण आहार योजनेअंर्गत दिल्या जाणाऱ्या आहारात राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. बालकांसह गर्भवती मातांना व्हेज पुलाव आणि पौष्टिक पफ देण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी नोव्हेंबर डिसेंबरपासून करण्यात येणार आहे.
रेडी टू कूक पोषण आहार
आतापर्यंत दिल्या जाणाऱ्या मूगडाळ खिचडीसोबत आता व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ (लाह्या) यांचाही समावेश करण्यात आला आहे. सुधारित ‘रेडी टू कूक’ पोषण आहाराची अंमलबजावणी नोव्हेंबर-डिसेंबरपासून होणार असून, पुणे जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांना वर्षातील ३०० दिवस या पौष्टिक आहाराचा लाभ मिळणार आहे.
घरपोच पोषण आहार योजना
महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडीतील बालके, गर्भवती आणि स्तनदा महिलांना पोषक, दर्जेदार व रुचकर आहार पुरविण्यासाठी घरपोच पोषण आहार योजना राबविण्यात येते. याअंतर्गत आतापर्यंत मूगडाळ खिचडी, बहुधान्य-प्रथिन मिश्रण आदी पदार्थ दिले जात होते.
Pune News: ‘महामेट्रो’ आणि ‘उच्च क्षमता मार्ग’ १२ ठिकाणी आमनेसामने, पुण्यात प्रकल्पांचा तिढा; मेट्रो आराखड्यात बदलाची शक्यता
व्हेज पुलाव आणि पौष्टिक पफ देण्यात येणार
नव्या सुधारित आराखड्यानुसार मूगडाळ खिचडी प्रीमिक्स कायम ठेवण्यात आला असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकिट दिले जाणार आहे. प्रथमच व्हेज पुलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, पूर्वीच्या भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी आता बहुधान्य पौष्टिक पफ (लाह्या) देण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अधिक चवदार, पौष्टिक आणि सहज स्वीकारता येईल असा आहार उपलब्ध होणार आहे.
‘सुधारित योजनेनुसार आता आहार ‘रेडी टू इट’ ऐवजी ‘रेडी टू कूक’ स्वरूपात दिला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र पॅकेटमध्ये खाद्यपदार्थ दिले जातील. लाभार्थ्यांना घरच्या घरी हे पदार्थ सहज शिजवून ताजे सेवन करता येणार आहे. पूर्वी मसाला व तेल मिश्रित स्वरूपात आहार दिला जात होता.
घरपोच पोषण आहार योजनेतील पाककृतींमध्ये करण्यात आलेल्या या बदलामागे लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, रुचकर आणि स्वीकारार्ह आहार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.
नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून घरपोच पोषण आहार
गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून सुधारित घरपोच पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित खाद्यसूची नुसार पोषण आहाराचा पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. सभापती महिला व बालविकास विभाग अंकिता पाटील यांनी दिली.
Nashik News: तीर्थक्षेत्र कपिलधारा येथे ११६ कोटींची कामे सुरू; विकासासाठी कटिबध्द
पुणे जिल्ह्यातील आहार पोषण दृष्टिक्षेप
. ४३९५ एकूण अंगणवाड्या
.१७ गर्भवती महिलांची अंदाजित संख्या
. ८७ हजार शून्य ते तीन वर्षातील बालकांची संख्या
