Crime News: मुलीसह आईनेही जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.
धावत्या रेल्वेसमोर आईने १४ वर्षांच्या मुलीसह स्वत:लाही झोकून दिलं, सोलापुरात हळहळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर: शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
वर्षा पांडुरंग अधटराव (वय 33) आणि स्वरा पांडुरंग अधटराव (वय 14, दोन्ही रा. सुशील नगर, सैफुल सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी आई आणि मुलीची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर ते टिकेकरवाडी रेल्वे ट्रॅकवरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458/3C जवळ रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दोघी आई-मुलगी अत्यंत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. रेल्वे ट्रॅकवर अपघात झाल्याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस हेड कॉन्स्टेबल जी. एस. मणुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस हेड कॉन्स्टेबल जी. एस. मणुरे यांनी वेळ न दवडता दोघींनाही तातडीने उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे सुशील नगर आणि संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. आई व मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा