• Fri. Jul 24th, 2026

    Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर अनेक गाड्या रद्द, काही गाड्या दुसऱ्या मार्गाला वळवल्या, वाचा A टू Z

    Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर अनेक गाड्या रद्द, काही गाड्या दुसऱ्या मार्गाला वळवल्या, वाचा A टू Z

    मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली होती. या मार्गावर दरड कोसळण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. प्रशासनाने दोन मार्गिका सुरु केल्या आहेत. दक्षिण-पूर्व घाट विभागातील तिसरी रेल्वे मार्गिका पूर्ववत होईपर्यंत मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन, वळवण्यात आल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मध्य रेल्वेच्या पथकाने कर्जत आणि लोणावळा दरम्यानची ‘दक्षिण-पूर्व डाउन मार्गिका’ आणि ‘मध्य मार्गिका’ यशस्वीरित्या पूर्ववत केल्यानंतर, आता तिसरी मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तिसरी मार्गिका पूर्ववत होईपर्यंत, मध्य रेल्वेने खालील गाड्यांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन किंवा गाड्या वळवणे या उपाययोजनांची मुदत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

    गाड्यांच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप तपासू शकतात. प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी दिली जात आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या व्यत्ययाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती प्रवाशांना करण्यात आली आहे. लोणावळा – कर्जत विभागातील ढिगारा हटवून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेची टीम आव्हानात्मक परिस्थितीत आणि कठीण भूप्रदेशात अहोरात्र (२४x७) काम करत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे.

    रद्द करण्यात आलेल्या गाड्या:

    खालील ‘डाऊन’ गाड्या रद्द करण्यात येतील

    • गाडी क्रमांक 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चेन्नई एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 11041 दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ रोजी

    खालील ‘अप’ गाड्या रद्द करण्यात येतील

    • गाडी क्रमांक 22158 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 22731 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 22943 दौंड – इंदूर एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस: दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस: दिनांक २६.०७.२०२६ रोजी

    Maharashtra TimesCJP Protest : सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य, प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारला वेळ हवा

    वळवण्यात आलेल्या गाड्या

    • दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे वळवलेल्या गाड्या
    • गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २३.०७.२०२६ ते दिनांक २६.०७.२०२६ पर्यंत
    • गाडी क्रमांक 22102 मदुराई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २४.०७.२०२६ रोजी
    • गाडी क्रमांक 11018 कारैकाल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक २७.०७.२०२६ रोजी.

    दौंड – मनमाड – जळगाव – पाळधी – सुरत मार्गे वळवलेल्या गाड्या

    • गाडी क्रमांक 20992 दौंड – अजमेर एक्सप्रेस (दिनांक २४.०७.२०२६)
    • गाडी क्रमांक 22193 दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस (दिनांक २६.०७.२०२६)
    • गाडी क्रमांक 22718 सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६ आणि दिनांक २७.०७.२०२६)
    • गाडी क्रमांक 16614 कोईम्बतूर – राजकोट एक्सप्रेस (दिनांक २४.०७.२०२६)

    दौंड कॉर्ड लाईन – मनमाड – भुसावळ मार्गे वळवलेली गाडी

    • गाडी क्रमांक 20821 पुणे – संतरागाछी एक्सप्रेस (दिनांक २७.०७.२०२६)

    Maharashtra TimesMumbai Protest : उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, भर पावसात शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांचा महापूर, नव्या पिढीचे ठाकरे बंधू रस्त्यावर

    मनमाड – दौंड कॉर्ड लाईन मार्गे वळवलेल्या गाड्या

    • गाडी क्रमांक 20822 संतरागाछी – पुणे एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६)

    कल्याण – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवलेल्या गाड्या

    • गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ पर्यंत)
    • गाडी क्रमांक 11017 लोकमान्य टिळक टर्मिनस – कारैकाल एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६)

    सुरत – पाळधी – मनमाड – दौंड – सोलापूर मार्गे वळवलेल्या गाड्या

    • गाडी क्रमांक 22717 राजकोट – सिकंदराबाद एक्सप्रेस (दिनांक २७.०७.२०२६)
    • गाडी क्रमांक 20968 पोरबंदर – सिकंदराबाद एक्सप्रेस (दिनांक २८.०७.२०२६)
    • गाडी क्रमांक 16613 राजकोट – कोईम्बतूर एक्सप्रेस (दिनांक २६.०७.२०२६)

    सुरत – पाळधी – मनमाड मार्गे वळवलेली गाडी

    • गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस (दिनांक २५.०७.२०२६)

    शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या

    • गाडी क्रमांक 11140 होस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २४.०७.२०२६ ते दिनांक २७.०७.२०२६ या कालावधीत पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
    • गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ या कालावधीत खडकी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

    शॉर्ट ओरीजनेटेड गाड्या

    • गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्सप्रेस दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ या कालावधीत पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात येईल.
    • गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट एक्सप्रेस दिनांक २५.०७.२०२६ ते दिनांक २८.०७.२०२६ या कालावधीत खडकी येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात येईल.