• Thu. Sep 10th, 2026

लोकभवन संकेतस्थळाच्या नावात बदल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई दि.९: नोव्हेंबर २०२५ मध्ये राजभवनाचे नाव लोकभवन झाल्यामुळे लोकभवनाच्या संकेतस्थळाचे नाव देखील बदलण्यात आले आहे.

नव्या संकेतस्थळाचे नाव  https://lokbhavan.maharashtra.gov.in असे झाले आहे.

लोकभवन पाहण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या अभ्यागतांसाठी नावनोंदणी करावयाच्या लिंकचे नाव देखील बदलले असून नवे नाव   https://lokbhavanvisit.maharashtra.gov.in असे करण्यात आले आहे.

पावसाळ्यामुळे लोकभवन भेटी बंद करण्यात आल्या होत्या.

लोकभवन भेटीची योजना दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्यासाठीचे ऑनलाइन बुकिंग उपरोक्त लिंकवर गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होईल.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed