सु्प्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला सोडणाऱ्या सहा खासदारांसह, लोकसभा अध्यक्ष आणि जॉईन सेक्रेटरी यांना नोटीस पाठवत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ठाकरे गटाकडून समाधान व्यक्त करण्यात आलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता मिळाली आणि त्यांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन झाला. या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याचं बोललं जात होतं. पण या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाने केलेल्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने लोकसभेचे जॉईन सेक्रेटरी, लोकसभा अध्यक्ष आणि सर्व सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोर्टात घडलेल्या या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली.
अरविंद सावंत काय म्हणाले?
“अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अचानक लोकसभेतून एक बुलिटीन निघालं. या बुलेटीनमध्ये जॉईन सेक्रेटरी पदावरच्या अधिकाऱ्याने असं लिहिलं की, सहा जणांना संलग्नता मागितली म्हणून त्यांची बसण्याची व्यवस्था खालील प्रमाणे केलेली आहे. त्या संलग्नतेला धरुन संविधानामध्ये अशी कुठे तरतूद आहे? त्यामुळे आम्ही आज सुप्रीम कोर्टात गेलो होतो. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश नरसिंह आणि आराध्य तिथे होते. त्यांच्यासमोर आमचे वकील देवदत्ता कामत यांनी हा विषय मांडला. तिथे सगळा विषय कोर्टात सांगण्यात आला”, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.
“या पद्धतीने जो बाजार मांडला गेला आहे त्याला प्रतिबंद करण्यासाठी अशाप्रकारे संविधानाला अनुसरुन नसलेली सूचनाबद्दल कारवाई केली पाहिजे किंवा स्थगिती दिली पाहिजे, अशी मागणी केली. पक्ष विलीन करण्याचा अधिकार हा जॉईन सेक्रेटरीला आहे? मग लोकसभा अध्यक्षांचं काय मत आहे? अध्यक्षांनी कोणत्या आधारावर याबाबत निर्णय घेतला. अशी कुठलीही माहिती नसताना या संदर्भात निर्णय आलेला आहे. मग कोर्टाने सांगितलं की, आम्ही त्यांना नोटीस जारी करतो. 15 दिवसांच्या आत उत्तर नोटीसचं उत्तर मागवू आणि फायनल सुनावणी 15 दिवसांनी घेऊ”, असं त्यांनी सांगितलं.
अरविंद सावंत यांनी कोर्टाच्या कारवाईवर व्यक्त केलं समाधान
“पहिली गोष्ट अशी आहे की, कोर्टाने पहिल्यांदा ही गोष्ट धुडकावून लावली नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आमचं म्हणणं मान्य केलं. नाहीतर म्हणाले असते की, हे कायदेशीर आहे. किंवा आणखी काही म्हणाले असते. असं काहीच म्हणाले नाहीत. उलट त्यांनीच नोटीस जारी केली”, असं म्हणत अरविंद सावंत यांनी समाधान व्यक्त केलं.
“ज्या जॉईन सेक्रेटरींनी बुलेटीन काढलं आहे त्यांना आता नोटीस जाईल. दोन्हीकडे नोटीस जाईल. त्या नोटीसचं त्यांचं उत्तर येऊ द्या. आज पहिली वेळ अशी की, सुप्रीम कोर्ट थोडसं आशेच्या किरण सारखं बोलले. प्रत्यक्षात कृती काय करते ते दिसेल. फार दूर नाही ना, पंधरा दिवसांची गोष्ट आहे”, असं अरविंद सावंत म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा