• Sat. Sep 5th, 2026

CJP चे आंदोलन सुरूच राहणार! पोलिसांच्या कारवाईनंतर साम्या कोरडेंची बेधडक मुलाखत

CJP चे आंदोलन सुरूच राहणार! पोलिसांच्या कारवाईनंतर साम्या कोरडेंची बेधडक मुलाखत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतून देखील मोठा पाठिंबा मिळाला. सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली.काही आयोजक व सहभागी आंदोलकांवर कारवाई करत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.ॲड. साम्या कोरडे यांच्या निवासस्थानी देखील पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.या घटनेनंतर साम्या कोरडे यांनी आपली बाजू मांडत निषेध नोंदवला आहे.विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असून भविष्य खराब केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला.आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर का दाखल करण्यात येतोय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed