• Sat. Sep 5th, 2026

एकनाथ शिंदेंवर रोष, शिवसेनेच्या आमदारांना घेराव, नांदेड बंददरम्यान मराठा बांधव आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजातर्फे आज नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी नांदेडात मोठी रॅली काढण्यात आली… शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात रॅली पोहोचली त्यावेळी शिंदे गटाचे नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोढारकर आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे सहभागी झाले होते. मात्र आमदार सहभागी होताच काही तरुणांनी त्यांना विरोध केला. काही वेळातच हा विरोध वाढत गेला आणि अखेर आमदार बोंढारकार आणि कल्याणकर यांना मोर्चातून बाहेर पडावे लागले.. मात्र असा काही प्रकार घडला नसल्याचं स्पष्टीकरण आमदार बोंढारकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed