Wardha Accident: समृद्धी महामार्गावर आयशर ट्रक एका चारचाकीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा करूण अंत झाला. कारमधील कुटूंब आपल्या लेकीला पुण्याला सोडून वर्धा येथे परतत असताना नियतीने घात केला.
परतीचा प्रवास अखेरचा ठरला
मुलीला पुण्यात सोडल्यावर परतीच्या मार्गाने निघालेल्या राजेश आणि आई सुषमा टिपले यांनी लेकीला हृदयाशी घेत पुन्हा लवकरच येऊ असे सांगत परतीची वाट धरली. वर्ध्याच्या दिशेने निघाले. गाडी दूरवर जाईपर्यंत तन्वी साऱ्यांना पाहत राहिली. वाटेत तन्वीच्या आठवणी सांगत गप्पागोष्टीत कुटुंब रमले. पण नियतीला मात्र काही तरी वेगळेच मंजूर होते. वर्ध्याकडे परतणाऱ्या कुटुंबावर समृद्धी महामार्गावर काळाने घाला घातला. अवघे कुटुंब उद्ध्वस्त झाले. परतीचा हा प्रवास आयुष्याचा अखेरचा ठरला. तन्वी आता पोरकी झाली आहे. अपघातात आईवडील आणि बहीण गेली. आज त्या मुलीसोबत केवळ आईवडिलांच्या आठवणी शिल्लक आहेत.
Samruddhi Expressway Wardha Accident: लेकीला MBAसाठी पुण्यात सोडून घरी निघाले, वाटेत ट्रकच्या धडकेत सहा जणांचा करूण अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
कारचालक अंकुश राऊत हा ऑटो आणि चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. तोदेखील या अपघातात ठार झाल्याने त्याची पत्नी, एक वर्षाची मुलगी, आईवडील, भाऊ यांचा आधार हिरावला गेला आहे. गावातील चार जीव एकाच अपघातात गेल्याने सोमवारी अपघे गाव अबोल झाले. गावातील कुणीही आज शेतावर गेला नाही. कुणी कामावर गेले नाही.
दरम्यान, वीरूळनजीक चॅनेल क्रमांक ७९जवळ इथेनॉल भरून असलेला ट्रक उलटल्याने नागपूर कॉरिडोरची वाहतूक थांबवून मुंबई कॉरिडोरने सोडण्यात आली. एकाच दिशेने नागपूरच्या दिशेने येणारी आणि जाणारी अशी दोन्ही वाहतूक सुरू होती. वाहनांची वर्दळ अधिक असल्याने कार चालकाचा गोंधळ उडून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर रात्री इथेनॉल घेऊन जाणारा टँकर उलटला होता. या टँकरमधून इथेनॉलची गळतीदेखील झाली. इथेनॉल गळत असल्याने वाहतूक दुसऱ्या लेनमधून वळविण्यात आली होती. टँकर उचलेपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्तदेखील लावला होता. रस्त्यावर इथेनॉल सांडल्याने एखादे वाहन पेट घेण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात होती. सोमवारी दुपारी या टँकरला उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. तर हा टँकर पेट घेऊ नये यासाठी त्यावर पाण्याचादेखील मारा करण्यात आला आहे. टँकर उचलण्यात आला असून या टँकर उलटण्यामुळे मात्र या भागात वाहतुकीत मोठी अडचण निर्माण झाली होती.
Mumbai BEST Bus Accident: ‘खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?’ बेस्ट अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडीओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा
इथेनॉलचा उलटलेला टँकर धोकादायक