• Fri. Sep 4th, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 19, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन – महासंवाद

पंढरपूर, दि. १९ : आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. भाविकांची दर्शन रांगेत मोठी गर्दी असून त्यांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मुखदर्शन घेऊन व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.

सत्कार व कामांचा आढावा:
मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचाही मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सत्कार केला.

यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची तसेच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन, संवर्धन व नवीन दर्शन मंडपाच्या कामाबाबतची सविस्तर माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर बाबत नागरिकांशी चर्चा केली. व  विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

याप्रसंगी आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा प्रणिती भालके, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम आदी उपस्थित होते.

Thane Traffic: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतूक मार्गात मोठे बदल ; उत्सवानिमित्त ठाणेकरांवर असणार ड्रोनच्या नजरा
Thane Dahi Handi Festival: ठाण्यात दहीहंडी उत्सवात कोट्यवधींचे लोणी ; मुंबई,पनवेल,अलिबाग,महाडसह, रत्नागिरीचे गोविंदा मटकी फोडायला सज्ज
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वेचा 15 दिवसांचा ब्लॉक; 42 ट्रेन्स रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले, कसे आहे नियोजन? पाहा वेळापत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed