Pune Railway Mega Block: ऐन गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहेत. पुणे रेल्वेवर १५ दिवसांचा ब्लॉक असणार आहे. कसे असणार नियोजन? जाणून घ्या
रेल्वेच्या नियोजनानुसार १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत पुणे-हडपसर मार्गावरील अप आणि डाउन मुख्य मार्गावर ब्लॉक असेल. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून ब्लॉकचा कालावधी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे.
Pune News : याला अजून मारायला हवं होतं, जो गणेशोत्सवावर बोलेल त्याला मारणारच; बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा उन्मादपणातीन ऑक्टोबरला हडपसर यार्डमध्ये सकाळी आठ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते चार या वेळेत वाहतूक ब्लॉक असेल. चार ऑक्टोबरला मुख्य कामाचा दिवस असून, हडपसर–जीसीएमसी विभागात मध्यरात्रीपासून सकाळी साडेदहापर्यंत वाहतूक ब्लॉक सुरू राहणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सिग्नल व दूरसंचार यंत्रणेशी संबंधित कामांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. या कामामुळे एकूण ४२ मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यातून एकूण ९८ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे; तसेच २५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार असून, त्यांचा ३६ फेऱ्यांवर परिणाम होईल. ३५ गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकाऐवजी अन्य स्थानकांवर अल्प समाप्त किंवा अल्प प्रारंभ करण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या ९९ फेऱ्या प्रभावित होतील.
Pune BJP News: पुण्यातील भाजप नेता कुटुंबासह बाहेर, आरोपींनी डाव साधला; उच्चभ्रू सोसायटीत घुसत महागड्या गाड्या फोडल्यायाशिवाय २२ गाड्यांच्या ७१ फेऱ्यांचे नियमन, तर १४ गाड्यांच्या २५ फेऱ्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई, पुणे-हावडा या एक्स्प्रेस गाड्यांस विविध मार्गांवरील गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, रद्दीकरण आणि मार्ग बदलाची माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे भविष्यात पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
