Salman Khan on Tukaram Mundhe : सलमान खानने वांद्रे येथील आपल्या मैत्रिणीच्या नवीन कॅफेचे कौतुक केले, पण त्याच वेळी स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत तर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना तिथे पाठवण्याची अप्रत्यक्षपणे मिश्किल तंबीही दिली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नामांकित रेस्टॉरंट्स, आलिशान क्लब्स आणि लोकप्रिय फास्ट-फूड सेंटरवर धडक कारवाया सुरु केल्यापासून राज्यात ‘तुकाराम मुंढे इफेक्ट’ दिसून येत आहे. या रिअल लाईफ ‘सिंघम’मुळे राज्यातील खाद्यसंस्कृतीत स्पष्ट बदल घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या आयएएस अधिकाऱ्याची दखल खुद्द बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यानेही घेतल्याचे दिसून येते. नुकतेच सलमानने वांद्रे येथील आपल्या मैत्रिणीच्या नवीन कॅफेचे कौतुक केले, पण त्याच वेळी स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत तर एफडीए प्रमुखांना तिथे पाठवण्याची अप्रत्यक्षपणे मिश्किल तंबीही दिली. त्याची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मैत्रिणीच्या कॅफेचं कौतुक
मित्रांसाठी नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या सलमान खानने नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या मैत्रिणीच्या नवीन कॅफेला सपोर्ट केला आहे. कॅफेच्या मालकिणीने शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा शेअर करुन तिच्या उपाहारगृहाची त्याने जोरदार प्रसिद्धी केली. मात्र त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इट्स डन, सिस
कोणाचेही थेट नाव न घेता, सलमानने गंमतीने धमकी दिली की, जर कॅफेने स्वच्छतेचे योग्य निकष पाळले नाहीत तर तो एफडीए आयुक्तांना तिथे पाठवेल. सलमानच्या खास शैलीतील विनोदाचा भाग म्हणजे या पोस्टमध्ये त्याच्या ‘इट्स डन, ब्रो’ या व्हायरल मीमचा हटके समावेश पाहायला मिळाला. यामुळे ही पोस्ट अधिकच मनोरंजक ठरली आहे.
Naldurg Killa News : रिक्षाचालक नवऱ्याच्या सांगण्यावरुन मुंबईतली नोकरी सोडली, विवाहितेचं नळदुर्गावर तीन लेकरांसह टोकाचं पाऊल, जुळ्या मुलींची जगण्याशी झुंज
सलमानची स्टोरी काय?
सलमानच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधील मजकुरात तो म्हणतो “सृष्टी, माझी कॉफी पुन्हा भरुन दे ना, प्लीज. किंमत वाढवू नको, गुणवत्ता टिकवून ठेव. स्वच्छता पाळा, नाहीतर मी ‘त्यांना’ (तुकाराम मुंढे यांना) पाठवेन आणि मग ‘इट्स डन, सिस’ (काम तमाम होईल).”
पुढे सलमान म्हणतो, ‘एक दिवस मी माझ्या बीईंग ह्युमनचा टीशर्ट माझ्या बीईंग ह्युमनच्या जीन्समध्ये खोचून येईन. कॉर्पोरेट वुमन तुझ्यासाठी मला अतीव आनंद होत आहे. या व्हिडिओत जी बोलताना दिसते, तीच मालकीण आहे आणि तीच बॅटमॅन आहे’ असे इन्साईड जोक्सही सलमानने मारल्याचं दिसतं.
सेलिब्रिटींना मुंढेंची भुरळ
तुकाराम मुंढे यांचं कौतुक करणारा सलमान हा काही पहिलाच सेलिब्रिटी नाही. गेल्या महिन्यात, टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिला मिळालेल्या कोल्ड ड्रिंकमध्ये झुरळ आढळल्यानंतर त्यांची मदत घेतली होती. तर त्याही आधी काही मराठी-हिंदी कलाकारांनी मुंढेंचे गोडवे गायले आहेत
सलमानचं सध्या काय चाललंय?
सलमान लवकरच ‘बिग बॉस २०’चा लोकप्रिय सूत्रसंचालक म्हणून परतणार आहे. हा रिअॅलिटी शो ६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरु होणार आहे. या सीझनमध्ये २० स्पर्धक घरात सहभागी होतील. संभाव्य यादीत करण वाही, रिया अहिर, मेरी कोम, माही विज, ईशा रिखी, कुशल तन्वर, अरिशफा खान आणि इतरांचा समावेश आहे.
Amravati Crime : बोलणं सोडल्याचा राग, एकतर्फी प्रेमातून 18 वर्षीय विद्यार्थिनीला भररस्त्यात संपवलं, 21 वर्षांचा माथेफिरु पसारअभिनयाच्या आघाडीवर, सलमानच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’चा समावेश आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ असे सुरुवातीचे शीर्षक असलेल्या या युद्ध-नाट्यपटाचे सध्या रिशूट सुरु आहे. तसेच, तो वमशी पैदिपल्ली यांच्या ‘मॉन्स्टर’ या चित्रपटात नयनतारासोबत दिसणार आहे. हा चित्रपट २०२७ च्या ईदला प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा