Crime News : १८ वर्षांची शर्वरी आणि २१ वर्षांचा आनंद गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. आनंद बीकॉम पूर्ण केल्यानंतर एसी दुरुस्तीचे काम करत होता, तर शर्वरी बीएससीच्या प्रथम वर्षात शिकत होती.
आनंद भड (वय २१, रा. रोही माना, मूर्तिजापूर) असे संशयित आरोपीचे नाव असून, घटनेनंतर तो पसार झाला आहे. शहर हादरवून सोडणारी ही संतापजनक घटना गुरुवारी दुपारी गजबजलेल्या रविनगर परिसरात घडली.
Crime News : उमाला हार्ट अटॅक आला की काय! खुर्चीत खिळलेल्या बायकोला पाहून पती घाबरला, दोनच मिनिटात गळा दिसला अन् धक्कादायक उलगडा
चाकूचे वार करुन आरोपी पसार
अंबाविहार परिसरात राहणारी शर्वरी दुपारी १२.४५ च्या सुमारास दुचाकीने कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. रविनगर येथील नाल्याच्या पुलाजवळ आधीच दबा धरून बसलेल्या आनंदने तिची दुचाकी अडवली. दोघांमध्ये काही मिनिटे वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या आनंदने सोबत आणलेल्या बॅगमधून भाजी कापायचा चाकू काढून शर्वरीवर सपासप वार केले. शर्वरी रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच स्थानिक नागरिक आणि वाटसरूंनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरला.
दोन वर्षांची ओळख
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शर्वरी आणि आनंद गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मूळचा मूर्तिजापूरचा असलेला आनंद बीकॉम पूर्ण केल्यानंतर अमरावतीच्या गोपालनगरमध्ये भाड्याने राहून एसी दुरुस्तीचे काम करत होता.
Naldurg Killa News : रिक्षाचालक नवऱ्याच्या सांगण्यावरुन मुंबईतली नोकरी सोडली, विवाहितेचं नळदुर्गावर तीन लेकरांसह टोकाचं पाऊल, जुळ्या मुलींची जगण्याशी झुंज
रागातून टोकाचा मार्ग
काही दिवसांपासून शर्वरीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्याचा फोन उचलणेही टाळले होते. या रागातूनच आनंदने हा टोकाचा मार्ग निवडल्याचा अंदाज आहे. घरातून भाजी कापायचा चाकू बॅगमध्ये घेऊन अमरावतीत आल्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. सध्या राजापेठ व स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या शोध घेत आहेत.
जेवण न दिल्याने मानकापुरात पत्नीचा खून
दुसरीकडे, जेवण न दिल्याने संतप्त झालेल्या पतीने मारहाण करून पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना नागपुरातील मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगरमधील गोविंद सिटी येथे घडली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.
कृष्णकांत यादव (वय ४१) असे अटकेतील आरोपीचे, तर यामिनी यादव (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णकांत बँकेत कार्यरत असून त्याला दोन अपत्ये आहेत. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री कृष्णकांत दारू पिऊन घरी आला. त्याने यामिनी यांना जेवण मागितले. दारू पिऊन आल्याने यामिनी संतापल्या आणि त्यांनी त्याला विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
Kolhapur Crime : कमल खरात नावाने फेक अकाऊण्ट, बहिणीच्या 17 वर्षांच्या प्रियकराला भावाने एकांतात भेटायला बोलावलं, स्वप्नवेल पॉइंटला भलतंच घडलंवाद विकोपाला गेल्याने कृष्णकांतने यामिनी यांना मारहाण केली. यामिनी यांनी प्रतिकार केला असता कृष्णकांतने त्यांना धक्का दिला. त्या पलंगावर पडल्या. त्यानंतर कृष्णकांतने त्यांचा गळा दाबला. यामिनी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले आणि मानकापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, गुरुवारी शवविच्छेदन अहवालात गळा आवळून यामिनी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून कृष्णकांतला अटक केली.
