• Sun. Jul 19th, 2026

    दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?

    दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे कमी वेळेत जाता यावे, यासाठी दिवे घाटात दुहेरी बोगदे (ट्विन टनेल) तयार करण्याचा प्रयत्न असून, त्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो तयार झाल्यास विमानतळापर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी होईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवे घाटातील नव्या मार्गाचे शनिवारी पुण्यात सूतोवाच केले.

    पुणे-शिरूर, हडपसर-यवत; तसेच तळेगाव- चाकण- शिक्रापूर या तीन उन्नत मार्गांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन पुण्यात झाले. त्या वेळी फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आदी विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Pune News: पुण्यातील उन्नत महामार्गांसाठी २५ वर्षे टोल; पुणे-शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव-शिक्रापूर मार्गांचा विकास होणार

    ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण होणार

    ‘पुरंदर विमानतळासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक जमिनींचे भूसंपादन पूर्ण झाले असून, देशाच्या इतिहासात इतक्या वेगाने विमानतळासाठी भूसंपादन होण्याचा हा विक्रम आहे. केवळ सहा महिन्यांतच जिल्हा प्रशासनाने ही कामगिरी केली आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. ऑगस्टपर्यंत सर्व भूसंपादन पूर्ण होईल. चालू वर्षात विमानतळाच्या कामाची निविदा काढून काम सुरू करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    पुरंदर विमानतळाची भूसंपादन प्रकिया देशातील सर्वात वेगवान मानली जात असून केवळ सहा महिन्यांत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुरंदर विमानतळामुळे पुण्याला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीच्या नकाशावर स्थान मिळणार आहे. या प्रकल्पांसाठी चार वर्षांची डेडलाइन दिली आहे. पण मुख्यमंत्र्‍यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MIDC) आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे प्रकल्प मुदतीच्या सहा महिने आधी म्हणजेच साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचने निर्देश दिले आहेत.

    प्रकल्पांसाठी लागणाऱ्या सर्व आवश्य मंजुरी आधीच मिळवल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. या कॉरिडोरमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांना महामार्गावर प्रवेश करण्यात मदत होणार आहे. भविष्यात तयार होणार मेट्रो मार्ग सामावून घेण्यासाठी उन्नत मार्गांच्या आराखड्यात यापूर्वीच तरतुदी केल्या आहेत. यामुळे मेट्रोच्या बांधकाम खर्चात सुमारे ४० टक्के घट होण्याची अपेक्षा आहे. पुणे शहरात ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प राबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या असून, ३६ किलोमीटरच्या या रस्त्याचे काम नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल.

    Maharashtra TimesWeather Update: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊसधारा; १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    ‘ते काम १५ दिवसांत’

    नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करावे लागेल. या रस्त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन ९० टक्के झाले असून, उर्वरित जागेसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. यासाठी आवश्यक असलेला १२६ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. पुढील १५ दिवसांत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सध्या अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. परंतु, बहुतांश प्रकल्पांचं काम रखडलं आहे. हिंजवडी मेट्रोला दिलेली १५ जुलैची मुदत उलटली असूनही अद्याप मार्ग सुरू झाला नाही. या प्रकल्पांचं काम वेळेत पूर्ण करणं शक्य होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed