Pune Metro 3: मेट्रो मार्गिका ३च्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांचं काम पूर्ण झालं आहे. १५ जुलै रोजी मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुली होईल अशी आशा होती पण ती तारीख उलटूनही प्रवासी अजून हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत.
उद्घाटन कशामुळे रखडलं?
पुणे शहरातील विविध भागांमधून कर्मचारी मोठ्या संख्येने हिंजवडी आयटी पार्कपर्यंत प्रवास करतात. हे सर्व प्रवासी सध्या रस्ते मार्गे प्रवास करत असल्यामुळे मार्गांवर तासंतास वाहतूक कोंडी होते. मेट्रो मार्ग सुरू होताच या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पण अजूनही पुणे मेट्रो ३ मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाली नाही आहे. ही अंतिम मंजुरी प्राप्त झाल्याशिवाय मार्गिका खुली करणं शक्य नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
New Pune City: नवी मुंबईच्या धर्तीवर ‘नवे पुणे’, पुरंदरमध्ये शहराचा नियोजित विस्तार करावा; नितीन गडकरींची सरकारला सूचना
पुणे मेट्रो ३ चं लोकार्पण दोन प्रमुख टप्प्यात होणार आहे. यापैकी पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. परंतु, अद्याप सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. त्याशिवाय मार्ग सुरू करता येणार नाही. न्यूज १८ त्या वृत्तानुसार, मेट्रो रेल सरक्षा आयुक्तांनी ५ जुलैपासून ते ९ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांची तपासणी केली. पंरत, या तपासणीचा अहवाल अजून सादर करण्यात आला नाही आहे. अधिकारी अजूनही या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. आयुक्तांना जर काही त्रुटी आढळून आल्या तर अहवालात काही बदल करण्याचे निर्देश दिले जातील. हे बदल केल्याशिवाय मेट्रो मार्ग खुला करणं शक्य नाही अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
पाएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी जून महिन्यात केलेल्या घोषणेनुसार मेट्रो लाइन ३च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन १५ जुलै रोजी होणार होतं. तसेच, उर्वरित ११ पैकी ५ स्थानकांचं काम ऑगस्टच्या अखेपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली होती. पंरतु, दरवेळी प्रमाणे यंदाही ही मुदत संपली पण मेट्रो अद्याप सेवेत दाखल झालेली नाही. त्यामुळे ही तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
Dive Ghat Twin Tunnels: दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?
कोणत्या स्थानकांचा समावेश?
पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्र प्रकल्पाला २००७ मध्ये मंजुरी मिळाली होतीय त्यानंतर सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (PPP)मॉडेल अंतर्गत हा मार्ग विकसित केला जाणार आहे. अंदाजे ८,००० कोटींचा खर्च करून ही मेट्रो विकसित केली जात आहे. ही मेट्रो मार्गिका २३.२०३ किमी लांब आहे. पहिल्या टप्प्यात माणमधील मेगापोलिस सोसायटी, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इनफोसिस फेज २, विपरो फेज २, पॉल इंडिया, शिवाजी चौक, कोर्टयार्ड बाय मॅरियोट, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेल आणि रामनगर या स्थानकांचा समावेश आहे.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो स्थानकं ऑक्टोबरपर्यंत खुली होण्याची शक्यता आहे. या मार्गावर हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बानेर गाव, बानेर, कृषी अनुसंधान, YASHADA, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी विद्यालय, शिवाजीनगर, जिल्हा व सत्र न्यायालय या स्थानकांचा समावेश असेल.
