• Mon. Jul 20th, 2026

    Laxman Hake: लक्ष्मण हाके अखेर राजकारणाच्या मैदानात; बारामतीतून पक्ष स्थापन करण्याची घोषणा, नावही ठरलं!

    Laxman Hake: लक्ष्मण हाके अखेर राजकारणाच्या मैदानात; बारामतीतून पक्ष स्थापन करण्याची घोषणा, नावही ठरलं!

    दीपक पडकर, बारामती : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्वतंत्र ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच, भाजप हुकूमशाहीच्या पद्धतीने कारभार करत असून विरोधी आवाज दडपण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

    बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना हाके म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष सर्व प्रकारची आंदोलने दडपण्याचे काम करत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.” ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी ओबीसी महामंडळांना पुरेसा निधी दिला जात नसल्याचे सांगितले. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांनाही विविध योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना थेट जाब विचारत, “ओबीसी समाजाच्या महामंडळांना निधी कधी देणार? विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांना आर्थिक तरतूद कधी करणार?” असा सवाल उपस्थित केला.

    ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्यात येणार असून त्यासाठी ‘ओबीसी जनता पार्टी’च्या माध्यमातून राज्यभर संघटनात्मक बांधणी करण्यात येईल, असेही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

    काय असणार राजकीय पक्षाची ध्येयधोरणे?

    नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत असताना लक्ष्मण हाके यांनी पक्षाची वाटचाल कोणत्या पद्धतीने असणार, याबाबतही भाष्य केलं आहे. “कोणालातरी आमदार होण्यासाठी, मंत्री होण्यासाठी, कोणाला मुख्यमंत्री होण्यासाठी, कोणाला खासदार होण्यासाठी आमच्या पार्टीची घोषणा करण्यात आली नसून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवरती काम करण्यासाठी ओबीसी जनता पार्टी तयार करण्यात आली आहे. कोणाचे लाड पुरवण्यासाठी हा पक्ष अजिबात नाही,” असंही लक्ष्मण हाके म्हणाले.

    दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी स्थापन केलेल्या ओबीसी जनता पार्टीला आगामी काळात राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव पाडण्यात यश मिळतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed