Latest Marathi News: कोकण विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून त्याची झलक मंगळवारपासून दिसेल, असा अंदाज आहे. सध्या महामुंबई परिसरात एखादी जोरदार सर अनुभवास येत आहे. मात्र यामुळे पाऊसमानात मोठी वाढ झालेली नाही. मात्र मंगळवार, २१ जुलैपासून कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे धरणक्षेत्राला किती दिलासा मिळणार आहे, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कास्टिंग यार्ड, रेडिमिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी मुलुंड डम्पिंग ग्राउंडमधील १५ एकर जागा मुंबई महापालिका विशेष हेतू कंपनी असलेल्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लिमिटेडला (अदानी कंपनीची उपकंपनी) देणार आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
