ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे. कारण जात पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र अपात्र ठरवलं आहे. त्याविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याची माहिती प्रिया सरवणकर यांनी दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द केल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण विशाखा राऊत यांनी आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी असून मुंबई हायकोर्टात अपील करणार असल्याचं म्हटलं होतं. पण मुंबई हायकोर्टाने विशाखा राऊत यांची याचिका फेटाळल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पालघर जिल्ह्यातील जात पडताळणी समितीने 20 ऑगस्टला विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्रे अवैध ठरवलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द करण्याची वारंवार मागणी सुरु होती. या मागणीनंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला पत्र लिहून कळवलं आहे की, विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवकपद आपोआप रद्द झालं आहे.
महापालिका आयुक्त पत्रात काय म्हणाल्या?
अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिवांना पत्राद्वारे याबाबत कळवले आहे. नगरसेविका प्रभाग क्रमांक 191 यांचे नगरसेवक पद आपोआप रद्द झाल्याने पुढील सहा वर्षे नगरसेवक पदाच्या निवडणूक लढवण्यास विशाखा राऊत अपात्र आहेत, असा उल्लेख आपण जे गॅझेट काढाला त्यामध्ये करावा, असं अश्विनी भिडे यांनी पत्रात म्हटलं आहे. लवकरच महापालिकेची सर्वसाधारण सभा राहील त्यावेळी याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Shiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवाद
प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळणार?
विशाखा राऊत यांच्या विरोधात माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी निवडणूक लढवली होती. दोघांमध्ये प्रचंड अटीतटीची लढत झाली होती. या अटीतटीच्या लढतीत विशाखा राऊत यांचा विजय झाला होता. तर प्रिया सरवणकर या दोन नंबरच्या ठरल्या होत्या. आता विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं तर प्रिया सरवणकर यांना नगरेसवकपदाची संधी मिळू शकते.
सत्याचा विजय झाला, प्रिया सरवणकर यांची प्रतिक्रिया
“विशाखा राऊत यांनी संविधानाचा अपमान केला होता. त्यांनी खोट्या पद्धतीने ओबीसी सर्टिफिकेट काढून एका ओबीसी महिलेचा अधिकार घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ओबीसी जागेवर निवडणूक लढवली होती. जात पडताळणी समितीने खूप चांगला निर्णय दिला होता. त्या विरोधात त्या हायकोर्टात आल्या होत्या. हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. मला आनंद होतोय की, सत्याचा आज विजय झाला आहे. ते एवढे वर्ष नगरसेविका होत्या. पण त्यांनी डिसेंबर 2025 मध्ये जात प्रमाणपत्र काढलं आहे. त्यांच्या घरात कुणाकडेही जात प्रमाणपत्र नव्हतं. त्यांनी निवडणुकीच्या काळात हे प्रमाणपत्र काढलं होतं”, अशी प्रतिक्रिया प्रिया सरवणकर यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा