नागपुरातील रामनगरच्या राममंदिरात उद्धव ठाकरे आणि अन्य शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत रामरक्षा महाआरती करण्यात आली. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अंबादास दानवे, सुनील प्रभू, नगरसेवक किशोर कुमेरिया, संपर्क प्रमुख सतीष हरडे, जिल्हाप्रमुख प्रीतम कापसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना नागपुरात सवाल, भागवत साहेब हेच हिंदूराष्ट्र तुम्हाला पाहिजे होतं का?
ठाकरे म्हणाले की, ‘रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपचा आता रामाशीच काय मानवतेशीही संबंध उरलेला नाही. रामरक्षा म्हणून दाखवा, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी ते रामभक्तांच्या बाजूने आहेत की देणगी चोरणाऱ्यांच्या, हे स्पष्ट करावे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ते स्पष्ट करावे. आपण रामरक्षा म्हणतो, ती रामाने आपली रक्षा करावी म्हणून. मात्र आज रामाचीच रक्षा करण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी भाजपला जाब विचारावा,’ असे ते म्हणाले.
राममंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एसआयटी’वर विश्वास नसल्याचे सांगत, निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र विशेष तपास पथक नेमण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली.
Sanjay Raut: पाटील, आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंना भेटले, राजकीय बदलाच्या चर्चांना उधाण; संजय राऊतांचं खास शैलीत रोखठोक भाष्य!
भाजपचे हिंदुत्व ढोंगी’
यावेळी ठाकरे यांनी लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना देण्यात आलेल्या वागणुकीचाही निषेध केला. वांगचुक यांना एखाद्या अतिरेक्याप्रमाणे रुग्णालयात नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या तोंडावर शाई फेकण्याच्या घटनेचाही ठाकरे यांनी निषेध केला.
Uddhav Thackeray : वर्गाच्या मॉनिटर सारखं बोलू नका, ठाकरेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर
जो रामाचा नाही, तो कामाचा नाही- फडणवीस
जो राम का नहीं, वो किसी के काम का नहीं, हे उद्धव ठाकरेंना आता समजले, याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. अयोध्येतील राम मंदिर दान अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे सुरू केलेल्या रामरक्षा आंदोलनावर फडणवीस यांनी उपरोधिक टीका केली. पुण्यातील तीन महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असता, त्या वेळी त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांना रामाची आठवण झाली, ही चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने का होईना त्यांनी थोडी रामरक्षा वाचावी. केवळ राजकीय कार्यक्रम न करता रामाच्या विचारांचेही स्मरण करावे, अशी माझी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.
