Pune Crime Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, पत्नीसह अज्ञातस्थळी रवाना, अटकपूर्व जामीनासाठी धडपड, खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे रविंद्र धंगेकर नॉटरिचेबल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनेनंतर, शिंदे गटाचे नेते तसेच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासमोरील संकट अधिकच वाढलं आहे. मागील काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून धंगेकर पती-पत्नीसह अन्य व्यक्तींवर पोलिसांनी रीतसर गुन्हा नोंदवला आहे. प्रशासनाने कारवाईचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे, रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर या दोघांनीही आपले फोन बंद ठेवले असून ते सध्या नॉटरिचेबल आहेत.
नॉटरिचेबल राहणे पसंत केलं
संभाव्य अटक टाळण्यासाठी धंगेकर दाम्पत्य सध्या अज्ञातवासात गेले असून, त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. तत्पूर्वीच पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी नॉटरिचेबल राहणे पसंत केले आहे. तर दुसरीकडे, त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या दिशांनी रवाना झाली आहेत. Crime News : टेकडीवर वॉकिंगला गेलेल्या उच्चशिक्षित तरुणींची छेडछाड, पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; छ.संभाजीनगरमध्ये काय घडलं?
व्हिडिओ बनवून आपल्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलं
दरम्यान, मृत बिल्डर खलील शेख यांनी फाशी घेण्याआधी एक व्हिडिओ बनवून आपल्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले होते. त्यामध्ये त्यांनी थेट धंगेकर पती-पत्नी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे व त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह काही जणांना जबाबदार धरले होते. या गंभीर आरोपानंतर स्वारगेट पोलीस स्थानकात माजी आमदार धंगेकर यांच्यासह एकूण १४ व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आला. Nanded Crime : जि.प. शिक्षक मृत्यू प्रकरण; पोटच्या दोन लेकरांसह स्वत: आयुष्य संपवलं, गोदावरी नदीत कार टाकली, PM रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार
मयत व्यावसायिकाच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायातील इतर सर्व लोक केवळ नावापुरते भागीदार होते आणि संपूर्ण आर्थिक कारभार रवींद्र धंगेकरच सांभाळत होते. आता या प्रकरणाच्या चौकशीत प्रत्येकाचा नेमका सहभाग काय होता आणि कुणाचे किती आर्थिक व्यवहार बाकी आहेत, याचा सखोल तपास केला जाणार आहे. तसेच, धंगेकर एका विशिष्ट व्यक्तीकडे स्वतःच्या पैशांसाठी वारंवार चकरा मारत असल्याचाही उल्लेख तपासात समोर आला आहे. मृताने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये तब्बल अडीच कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. हा सर्व प्रकार अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरूपाचा असल्याने, या गुन्ह्यात सखोल तपास करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा