Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकी घटना काय?
सूरज सतीश साळवे (वय 20, रा. प्रगती कॉलनी), आकाश राजू म्हस्के (वय 23, रा. श्रावस्ती कॉलनी), ऋषिकेश रतन नवागिरे (वय 21, रा. जयभीम नगर) आणि आदर्श ईश्वर वाकेकर (वय 20, रा. जयभीम नगर, टाऊन हॉल) या चारही आरोपींवर भा.दं.वि. कलम 354 (विनयभंग) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आणि विद्यापीठ परिसरातच राहणाऱ्या दोन तरुणींपैकी एकीने पीएच.डी. तर दुसरीने एम.एस्सी. पूर्ण केले आहे.
Nanded Crime : जि.प. शिक्षक मृत्यू प्रकरण; पोटच्या दोन लेकरांसह स्वत: आयुष्य संपवलं, गोदावरी नदीत कार टाकली, PM रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास या दोघी विद्यार्थिनी विद्यापीठात बॉडीगार्ड असलेल्या आपल्या मित्रासोबत हनुमान टेकडी येथे वॉकिंगसाठी गेल्या होत्या. तरुणी टेकडीवरून खाली येत असताना हॉटेल गारवाजवळ काही तरुण उभे राहून दारू पित होते. यातील एका मद्यधुंद तरुणाने या दोन्ही तरुणींना पाहून अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. या प्रकारानंतर तरुणींसोबत असलेल्या कुलगुरूंच्या बॉडीगार्डने तत्परता दाखवत त्या तळीरामांना अश्लील भाष्य करण्याबाबत जाब विचारला. याचा राग आल्याने मद्यधुंद तरुणांनी थेट बिअरची बॉटल त्याच्यावर फेकून मारली आणि वाद घालण्यास सुरुवात केली.
पोलीस ठाण्यात महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा
हा राडा सुरू असतानाच बेगमपुरा पोलीस ठाण्याची 112 क्रमांकाची गस्तीवर असलेली गाडी तिथून जात होती. पोलिसांनी तरुणींकडे चौकशी करून चारही आरोपींना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सागर शिंदे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी तातडीने घटनास्थळी व पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या नातेवाईक महिलांनी तिथे प्रचंड गोंधळ घातला. पोलीस समजावून सांगत असताना काही महिलांनी थेट पोलिसांवर हात उचलले आणि महिला पोलिसांचे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला. अखेर दंगा काबू पथकाला पाचारण करून हा ड्रामा शांत करण्यात आला. पीडित तरुणींच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Nashik Metro: नियमित मेट्रोचा अंतिम मसुदा ‘ट्रॅक’वर! आराखड्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे बैठक
मुलांच्या कुटुंबीयांची बाजू
दरम्यान, या प्रकरणावर आरोपी मुलांच्या कुटुंबीयांनी आपली बाजू मांडताना पोलिसांमधील तक्रारीतील आरोप फेटाळले आहेत. मुलांच्या पालकांनी आरोप केला आहे की, ‘आमची मुले तिथे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होती. त्याचवेळी त्या दोन तरुणींसोबत कुलगुरूंचा बॉडीगार्ड तिथून जात होता. मुलांना व्हिडिओ काढताना पाहून, ते आपलाच व्हिडिओ काढत असल्याचा संशय बॉडीगार्डला आला. याच संशयातून बॉडीगार्डने मुलांना जाब विचारला आणि त्यावरून हा वाद झाला आहे. मात्र, आमच्या मुलांना वेगळ्या कारणाने अडकवले जात आहे’.
