• Sun. Jul 19th, 2026
    Nashik Crime : वैष्णवी आवारे मृत्यू प्रकरण; दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग, बॉयफ्रेंडला कळताच नको ते केलं, नाशिकमधील घटनेचा उलगडा

    Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

    नाशिक वैष्णवी आवारे मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : इंदिरानगर परिसरात पीजीमध्ये राहणारी तरुणी वैष्णवी आवारे हिचा काल शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेतील संशयित साहिल लावारे हा इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात झाडाला आत्महत्या केलेल्या अवस्थेत मिळून आला. या घटनेनं इंदिरानगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    वैष्णवी हिचं लग्न दुसऱ्यासोबत ठरल्यानं प्रियकर साहिल आवारे याने वैष्णवी हिचा खून केला असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांच्या बहिणीची आणि मयत वैष्णवी हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. याचदरम्यान तक्रारदार यांची वैष्णवी हिच्याशी चांगली ओळख झाली होती. त्यानंतर वैष्णवी हिच्या मैत्रिणीने तक्रारदार यांच्या बहिणीला, ‘वैष्णवी ही चांगली मुलगी असून, तिला आई वडील नाहीत. गावी आजी आजोबा आहेत. ती तक्रारदार यांच्यासोबत चांगला संसार करू शकते’, असं सांगितलं.
    Maharashtra TimesMatheran Hill Railway: ‘माथेरानची राणी’ हायड्रोजनच्या बळावर धावण्याची शक्यता; ऐतिहासिक मिनी ट्रेनच्या नव्या प्रवासाची तयारी
    त्यानंतर वैष्णवी आणि तक्रारदार यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्यावेळी वैष्णवी हिने ‘आपले याआधी साहिल लावारे (रा.उमरखेड, जि.यवतमाळ) याच्यासोबत अफेअर होते. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत’, असं सांगितलं. त्यानंतर तक्रारदार यांचा वैष्णवी हिच्यावर आणखी विश्वास दृढ झाला आणि त्यांच्या दोघांनी लग्न करण्याचं ठरविलं. मात्र त्यानंतर ही बाब साहिल याला समजली आणि साहिल याच्याकडून वैष्णवी हिला फोन करून त्रास देण्यास सुरुवात झाली. ही बाब देखील वैष्णवी हिने तक्रारदार यांना कळवली होती.

    ‘वैशुला आज संपवले’

    त्यानंतर काल शुक्रवारी रोजी 9 वाजता साहिलने तक्रारदार यांना फोन करून, ‘वैष्णवी हिला समजावून सांग, आणि माझ्याकडे पाठवून दे’, असं सांगितलं होतं. त्यांनंतर तक्रारदार यांनी वैष्णवी हिला त्रास न देण्यास सांगितलं. मात्र, साहिल याने वैष्णवी हिला त्रास देणं सुरूच ठेवलं. वैष्णवी हिने तक्रारदार यांना फोन केला आणि ‘साहिल येथे आला आहे’, असं सांगितलं. याचवेळी साहिल आणि वैष्णवीचा फोन सुरु होता. तब्बल 22 मिनिटे हा फोन सुरूच होता. संपूर्ण घडत असलेली घटना ही तक्रारदार फोनवर ऐकत होते.
    Maharashtra TimesDhule Accident : देवदर्शनाहून येताना चालकाचं नियंत्रण सुटलं, कार दुभाजक तोडून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोघांचा करुन अंत
    यावेळी सुरू असलेल्या फोनवर साहिल आणि वैष्णवी हिचे जोरदार भांडण सुरू असल्याचं सांगण्यात आलं आणि अखेर ‘वैशुला आज संपवले’, असा आवाज आला आणि फोन कट झाला’ असल्याचं तक्रारदार यांनी सांगितलं. त्यांनंतर तक्रादर वैष्णवी राहत असलेल्या इंदिरानगर येथील वनसंपदा कॉलनी येथे पोहोचले असता वैष्णवी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि आजूबाजूला मोठी गर्दी देखील झाली होती, असं तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे.
    Maharashtra TimesAccident News: पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
    या घटनेला काही तास ओलांडत नाही तोच साहिल याचा इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह हा आढळून आला. या संपूर्ण प्रकाराचा आता इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा