• Sat. Jul 18th, 2026

    Tukaram Mundhe: एफडीएची लातूरमध्ये मोठी कारवाई; प्रसिद्ध बंगलोर अय्यंगर्स बेकरीवर धाड, किचनमधील भीषण चित्र समोर!

    Tukaram Mundhe: एफडीएची लातूरमध्ये मोठी कारवाई; प्रसिद्ध बंगलोर अय्यंगर्स बेकरीवर धाड, किचनमधील भीषण चित्र समोर!

    Latur News: बेकरीतील सुमारे २ हजार ७०० रुपयांचा ९ किलो खव्याचा साठा जागीच नष्ट करण्यात आला.

    एफडीएची लातूरमध्ये मोठी कारवाई; प्रसिद्ध बंगलोर अय्यंगर्स बेकरीवर धाड, किचनमधील भीषण चित्र समोर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर: भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर कारवाईचा धडाका सुरू असताना लातूर जिल्ह्यातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. रेणापूर येथील एका बेकरीवर एफडीएने धाड टाकली. रेणापूर शहरातील गांधी चौक परिसरात ही बेकरी मागील बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. मात्र या ठिकाणी अस्वच्छता व कालबाह्य अनेक गोष्टी वापरत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर एफडीने धाड टाकली. यावेळी केलेल्या तपासणीत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे आणि मुदतबाह्य कच्चा माल वापरला जात असल्याचे उघडकीस आले. जनआरोग्याचा धोका लक्षात घेऊन बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित करत व्यवसाय बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

    बेकरीचा परवाना निलंबित, मात्र दुकान सुरू

    बेकरी चालकाचा हा निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन पाहता अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी जागीच कडक पावले उचलली. या बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. मात्र आज सकाळी पुन्हा या दुकानदाराने आपले दुकान मोठ्या जोमाने थाटल्याचे दिसून आले. यामुळे अशा नियमबाह्य दुकानांना एफडीए आळा कसा घालणार, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

    मुदत बाह्य कच्चामालाचा वापर

    तपासणीदरम्यान बेकरीमध्ये विविध कंपन्यांचे व्हाईट कंपाउंड चॉकलेट आणि ब्रेड पावडर असा ३ हजार ५९ रुपयांचा मुदतबाह्य साठा आढळून आला. हा साठा जागीच नष्ट करण्यात आला. तसेच मिठाई आणि बेकरी उत्पादनांसाठी आणलेला १० किलो खवा योग्य तापमानात साठवलेला नसल्याचेही निदर्शनास आले. यापैकी प्रयोगशाळेतील तपासणीसाठी खवा आणि मिल्क टोस्टचे नमुने जप्त करण्यात आले आहेत.

    लातूर जिल्ह्यातील अनेक बेकरी चालक झाले सजग

    रेणापूर येथे बेंगलोर अय्यंगर बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आल्यानंतर अनेक बेकरी चालकांनी आपल्या दुकानातील माल कालबाह्य आहे की नाही, याची तपासणी केल्याचे पाहायला मिळाले. आपल्यावर कारवाई होणार नाही, याची काळजी दुकानदार घेताना दिसून येत आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा