• Wed. Sep 2nd, 2026

Nanded Crime : पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, कल्पनाही करणार नाही अशा ठिकाणी घाणेरडा धंदा, धाडीत 7 महिलांची सुटका

नांदेड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका स्पा सेंटरमध्ये हायप्रोफाईल देहव्यापाराचा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा संबंधित प्रकार उघडकीस आला. या कारवाईत एकूण 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
​नांदेड : नांदेडमध्ये पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर आणि अतिशय गजबजलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या स्पा सेंटरमध्ये संतापजनक प्रकार सुरु होता. संबंधित कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्यानंतर आरोपींना रंगेहात पकडत त्यांच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेने या स्पा सेंटरमध्ये धाड टाकून हायप्रोफाईल देहव्यापाराचा पर्दाफाश केला. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर शहरातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारवाई ही मंगळवारी रात्री शहरातील फुले मार्केट परिसरातील एका इमारतीमध्ये करण्यात आली. कारवाई दरम्यान एलसीबीच्या पथकाने नेपाळ, नागालँड, दिल्लीसह देशातील विविध राज्यांतील 7 पीडित महिलांची सुटका केली. शिवाय तीन जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे शिवाजीनगर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हा काळा धंदा उघडपणे सुरू होता.

Maharashtra TimesShiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवादनांदेड शहरातील फुले मार्केट परिसरात महापालिकेने बीओटी तत्वावर महात्मा फुले मार्केट भव्य संकुल उभारले आहे. याच संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर वेलनेस स्पा सेंटर आहे. या संकुलातील वेलनेस स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यापार सुरु होता.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने एक बनावट ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठवला. तेथील व्यवस्थापकाने देहव्यापारासाठी बनावट ग्राहकाकडून 4 हजार रुपये उकळले. सौदा पक्का होताच बनावट ग्राहकाने बाहेर तयार असलेल्या एलसीबीच्या पथकाला माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी धाड टाकली.

Maharashtra TimesVishakha Raut : मुंबईतच ठाकरेंना धक्का, विशाखा राऊत यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, नगरसेवकपदावर टांगती तलवार

7 पीडित महिलांची सुटका

या कारवाई दरम्यान नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे आणि पुणे येथील एकूण 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना आमिष दाखवून या दलदलीत ढकलण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.​ कारवाई दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी हिफझुल रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद (सर्व रा. आसाम) यांना ताब्यात घेतले.

Maharashtra TimesEknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

मुंबईतील व्यक्ती स्पा सेंटर चालवत असल्याची माहिती

कारवाईची चाहूल लागताच स्पा सेंटरचा मालक संतोष बघे हा घटनास्थळावरून फरार झाला. मुंबई येथील एक व्यक्ती हा स्पा सेंटर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे घटनास्थळाच्या दोनशे मीटर अंतरावर शिवाजीनगर पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्याच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर असा प्रकार सुरू असल्याने पोलिसांना याची माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा