उद्धव ठाकरे यांनी नागपुरात राम मंदिरात रामरक्षा पठण केल्यानंतर जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून प्रश्न विचारला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात रामनगर येथील प्रसिद्ध राम मंदिरात रामरक्षा पठण केलं. यानंतर त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल केला. “हे नागपूर असल्याने मला सरसंघचालक मोहन भागवत यांना मला विचारायचं आहे की, भागवत साहेब ज्या पद्धतीने हे सरकार वागत आहे, मंदिरं लुटली जात आहेत. विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागत आहेत ते तुम्ही पाहताय. पेपर फुटत आहेत, पक्ष तर फोडले जात आहेतच, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्यादेखील फोडल्या जात आहेत. हेच हिंदूराष्ट्र तुम्हाला पाहिजे होतं का? “, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत ठाकरेंचा सवाल
“आमच्या हिंदू राष्ट्रात आम्हाला रामराज्य अपेक्षित आहे, आम्हाला शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरिबांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना न्याय देणं हे आमचं खरं हिंदू राष्ट्र आहे. कंत्राटदारांना अभय देणारं हिंदू राष्ट्र असू शकत नाही. त्यामुळे भागवत साहेब तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बोलला होतात की, या देशातले मुस्लीम सुद्धा हिंदूच आहेत आणि हिंदूंनी दोन ते तीन अपत्य जन्माला घातली पाहिजेत. पण ज्या तरुणांनी नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केली त्यांचं पहिले काय करणार? आणखी अपत्य जन्माला घालून तुम्ही पुन्हा त्यांनाही तसंच चिरडणार? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाहीय. अजिबात नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंनी शिवसैनिकांचे मानले धन्यवाद
“अयोध्येत मंदिर उभं राहिलं. पण नवा लढा हा मंदिराच्या रक्षणासाठी करावा लागत आहे. मी पहिले प्रथम या मंदिराच्या सर्व ट्रस्टी आणि गुरुजींना धन्यवाद देतो. कारण त्यांनी सहकार्य केलं. नुसतं सहकार्यच नाही तर आशीर्वाद सुद्धा दिले. या कार्यक्रमासाठी ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंकडून फडणवीसांचा उल्लेख
“आज सकाळीच संजय राऊत यांचा फोन आला. म्हणाले, उद्धव टेलिप्रॉम्पटर ठेवायचं का? म्हटलं का? कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलं आहे की, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की, फडणवीसजी रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या रामभक्तांचं काम आहे. आम्ही रामरक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय, म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव. हे आमचं हिंदुत्व नाहीय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांचं सोनम वागचुक यांच्या आंदोलनावर भाष्य
“आज सकाळी नागपुरासाठी निघाल्यानंतर पहिली बातमी ही दिल्लीतून आली. गेले जवळपास 20 दिवस देशातील तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, जणू काही एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“ज्या पद्धतीने हे सरकार वागत आहे, मी प्रभू रामांना विचारतोय की, श्रीराम हे काय चाललंय? ज्या भाजपने तुझ्या नावाने सत्ता आणली. त्या भाजपच्या अंगात श्रीरामांच्या ऐवजी सैतान घुसले आहे की काय? माणुसकी गेली बाजुला. पण यांच्यातला सैतान कसा जागा झाला? एवढे सत्तापिपासू हे कसे झाले?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा