दहीहंडी उत्सवात आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. कारण पोलीस आयुक्तांनीच याबाबत इशारा दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. गणेशोत्सवापूर्वी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात अभिनेत्री, अभिनेते तसेच नामांकित खेळाडूंसह विविध सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार असल्याने उत्सवाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दहीहंडी उत्सवावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी तसेच इतर कलाकारांना आमंत्रित केले जाते. मात्र, काही ठिकाणी कार्यक्रमादरम्यान स्टेजवर अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्याचे प्रकार घडताना दिसतात. अशा प्रकारांमुळे कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील डान्स किंवा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास संबंधित मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
Shiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवाद
पोलीस आयुक्त काय म्हणाले?
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पोलीस आयुक्तांनी दहीहंडी आयोजकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या नावाखाली अश्लीलता किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यक्रमाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास पोलिसांकडून त्याची दखल घेऊन संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील गणेश मंडळांची समन्वय बैठक घेतली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या. यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबतही नियम व निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.
गणपती मंडळांना पुरस्कार
गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शांततेत आणि संयमाने विसर्जन मिरवणूक पार पाडणाऱ्या गणेश मंडळांचा यावेळी पोलिसांकडून ‘श्री मोरया गणपती पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. या माध्यमातून नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
पोलिसांचं नागरिकांना आवाहन
गणेशोत्सव आणि दहीहंडी हे दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असले तरी उत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही पोलिसांसोबतच आयोजकांची आणि नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे दहीहंडी मंडळांनी अश्लील नृत्य, आक्षेपार्ह कार्यक्रम तसेच गर्दीला कारणीभूत ठरणारे प्रकार टाळावेत. गणेश मंडळांनीही लेझर, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.
यंदाच्या उत्सव काळात पोलिसांकडून विशेष बंदोबस्त आणि नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याने दहीहंडी आणि गणेश मंडळांनी पोलिसांच्या सूचनांना प्रतिसाद देत उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करणे गरजेचे आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा