• Fri. Jul 17th, 2026
    Nashik News : ‘ये दादा तू रडू नको’; मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला गेला पुन्हा परतलाच नाही, अभिजीतचा बुडून करुण अंत; घटनास्थळी मित्राचा हंबरडा

    Nashik Dugarwadi Waterfall Youth Drowns : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्रांसोबत धबधबा परिसरात फिरायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.

    दुगारवाडी अभिजीत पवार बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका 20 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. अभिजीत पवार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. घटनास्थळी अभिजीतच्या मित्रांनी एकच हंबरडा फोडला.

    नेमकी घटना काय?

    अभिजीत हा जेल रोड परिसरात राहत होता. काल सकाळी तो सात मित्र आणि तीन मैत्रिणींसोबत दुगारवाडी धबधबा परिसर फिरण्यासाठी गेला होता. यादरम्यान पावसाचा आनंद घेत असताना दुगारवाडी धबधब्यात अभिजित पवार बुडाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती येथील वनविभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक पोलीस ठाण्याचे शिपाई कुणाल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अभिजितला सुरुवातीला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला स्वतः खांद्यावर उचलून वर आणलं. त्यास उपचारासाठी तत्काळ खासगी वाहनानं त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
    Maharashtra TimesCrime News: सुखी संसार अचानक उद्ध्वस्त; पल्लवीने मृत्यूला कवटाळलं, नवऱ्यासह कुटुंबातील सहा जण अडकले!

    मित्राच्या जाण्याने इतर मित्रांना मानसिक धक्का

    या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या मित्रांना तीव्र मानसिक धक्का बसला. त्यामुळे प्रणव खरे, जय चौगे आणि रितेश खरे या तिघांची तब्येत खालावल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गणेश शिंदे आणि परिचारिका पार्वती पडवळ यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. तर अभिजित पवार यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवित, उपनिरीक्षक जायभावे, यांच्या पथकाने परिस्थितीची पाहणी केली. तर किरण चौधरी यांनी मयत युवकाच्या कुटुंबीयांना आधार दिला.
    Maharashtra TimesNanded Crime : मुलांना शाळेत सोडण्याचा बहाणा, धावती कार थेट नदीपात्रात, स्टेटस ठेवत शिक्षकाने सोन्यासारख्या लेकरांसह आयुष्य संपवलं

    प्रशासनाचं महत्त्वाचं आवाहन

    ‘पावसाळ्यात अतिउत्साहाच्या भरात अनोळखी ठिकाणी, डोंगर-दऱ्यांमध्ये अथवा पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पर्यटकांनी उतरू नये. आपल्या जीवाची काळजी घ्यावी’, असं आवाहन त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा