Mother Death Case: काही दिवसांपूर्वी तन्वीच्या आईची प्रकृती खालावली आणि नुकताच तन्वीला आपल्या आईच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला.
आजारी आईचा मृत्यू; ११ वर्षीय तन्वीने धैर्य दाखवलं, माऊलीला दिला मुखाग्नी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग: घरची परिस्थिती बेताची… आईला एका दुर्धर आजाराने ग्रासलेलं असताना वडील तळेरे येथे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत होते. अशातच कुटुंबातील ११ वर्षांची चिमुकली खेळण्या बागडण्याच्या वयात परिस्थितीची जाणीव ठेवत आईच्या आजारपणात खंबीरपणे उभी राहिली. मात्र आजारी असलेल्या आईची प्राणज्योत मालवली. आईच्या मृत्यूनंतरही चिमुकली धाडसाने उभी राहिली आणि आईच्या पार्थिवाला अग्निसंस्कार करण्याचे धैर्यही या चिमुकलीने दाखवलं आहे. अगदी लहान वयातच आलेला समजूतदारपणा, या वयातही मुलीने घेतलेली खंबीर भूमिका हा सगळा प्रसंग पाहून उपस्थितांचे मन हेलावले. ही घटना घडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे येथे.
तळेरे वाघाची वाडी येथील संदीप चव्हाण यांची पत्नी प्रियांका यांना एका दुर्धर आजाराने गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रासलं होतं. या कुटुंबात पती, सासरे व मुलगी असे राहतात. ११ वर्षांची तन्वी हीच कुटुंबाचा आधार ठरली आहे. वडील कष्ट करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना आई आजारी असल्यामुळे घरचे जेवण बनवणे, घरात मदत करून आपल्या अभ्यासाची जबाबदारी पार पडत शाळेत जाणे, अशी तन्वीची दिनचर्या सुरू होती. तन्वी हिने आपल्या आजारी असलेल्या आईलाही मानसिक आधार दिला होता. आजारपणातून बाहेर पडण्यासाठी तिला तन्वीच मानसिक आधार देत होती. तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालयात इयत्ता पाचवी इयत्तेत शिकणारी तन्वी अभ्यासातही हुशार आहे. तिला कलाक्षेत्राची आवड आहे. मात्र तिला नुकताच मातृशोक झाला.
निर्माण झालेल्या परिस्थितीला याही वयात खंबीरपणे सामोरे जात आपल्या लाडक्या आईला तन्वीने मुखाग्नी दिला. यावेळी तिचे हात थरथरत होते, तिच्या डोळ्यांची अश्रू थांबत नव्हते. हे हृदयद्रावक चित्र पाहून उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थही गलबलून गेले. कुटुंब व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आईच्या पार्थिवाला तन्वी हिने मुखाग्नी देत अखेरचा निरोप दिला. निष्ठुर नियतीमुळे निर्माण झालेल्या प्रसंगालाही धैर्याने ही चिमुकली सामोरे गेली.
दरम्यान, ११ वर्षीय तन्वी हिने दाखवलेल्या या धैर्याची तळेरेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चा होत आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा