• Wed. Aug 26th, 2026

Cab Drivers Mumbai High Court: भाषेच्या ज्ञानाच्या अभावावरून बॅज निलंबित करणे किंवा रद्द करण्याचा अधिकारही सरकारला नाही. त्यामुळे राज्य सरकारची ही अधिसूचनाच घटनाबाह्य असल्याने याचिकेवरील अंतिम निकालापर्यंत ती स्थगित करावी’, असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : रिक्षा, टॅक्सी व कॅबचालकांना व्यावहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला असताना, ॲप-आधारित कॅब चालवणाऱ्या चार चालकांच्या याचिकेमुळे आता हा विषय मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या नियमाने मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला असून, याविषयी उद्या, गुरुवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.

रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांशी मराठी भाषेतून संवाद साधता यावा यादृष्टीने राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी तसेच कॅब चालकांना १ मे ते १५ ऑगस्टपर्यंतचा अवधी दिला होता. तसेच एक हजार ८०० शिक्षक नियुक्त करून मराठीचे वर्गही सुरू करण्यात आले होते. त्यानंतर, १२ ऑगस्ट रोजीच्या अधिसूचनेद्वारे मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली. त्यानुसार, मराठी भाषेचे किमान ज्ञान प्राप्त न केलेल्या चालकांना सध्या केवळ एक महिन्याची नोटीस दिली जात आहे. त्यानंतर कठोर कारवाई होणार आहे.

Maharashtra TimesMahalaxmi Papamani : साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?या पार्श्वभूमीवर, ‘या नियमाची अंमलबजावणी केल्यास लाखो गरीब व परराज्यांतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या चालकांचे बॅज निलंबित होऊन त्यांचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. अशा कारवाईमुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा येईल. पर्यायाने राज्यातील सुमारे नऊ लाख ६५ हजार चालकांना त्रास सहन करावा लागू शकतो’, असा दावा मोहम्मद कासिम अहमद यांनी ॲड. विवेक शुक्ला यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत केला आहे.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वाद, फडणवीसांनी महायुतीच्या बैठकीत नेत्यांचे कान टोचले; शिंदे, सुनेत्रा पवारांसमोर काय म्हणाले?याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय ?

‘मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करणारा हा नियम राज्यघटनेतील अनुच्छेद १४ अंतर्गत असलेला समानतेचा हक्क, अनुच्छेद १९ अंतर्गतचा व्यापार व व्यवसाय करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क आणि अनुच्छेद २१ अन्वये जीवन जगण्याचा हक्क या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे. तसेच, मोटार वाहन कायद्यात वाहन चालवण्याचा परवाना मिळविण्यासाठी कोणत्याही भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याची तरतूद नाही. चालकाला कोणत्याही भाषेचे कार्यक्षम ज्ञान असावे, ही पात्रता निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तसेच, बॅज देण्यासाठी किंवा परमिटसाठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचाही अधिकार नाही.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा