• Wed. Aug 26th, 2026

Onion Price: वाशीच्या घाऊक बाजारात मंगळवारी कांदा ३८ ते ४४ रुपये प्रतिकिलो होता. किरकोळ बाजारात हा भाव ५० ते ६० रुपये होता

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबईसह महानगरांमध्ये कांद्याच्या भावात वाढ झाल्याने केंद्र सरकारने बाजारातील पुरवठा वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्राकडून दिल्लीसह महानगरांमध्ये स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा कांदा बाजारात आल्यानंतर मुंबई महानगरातील ग्राहकांना अंशत: दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील नाशिक व लासलगाव परिसरातून विशेष रेल्वे रेकद्वारे (कांदा एक्स्प्रेस) कांदा दिल्ली, चेन्नईसह प्रमुख महानगरांमध्ये पाठवण्यात येणार आहे. सुमारे ८०० टन कांद्याची पहिली कांदा एक्स्प्रेस रेल्वे बुधवारी दिल्लीत पोहोचणार आहे. हा कांदा नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडारांमध्ये ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाईल, असे ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai News: ‘भाषावाद’ न्यायालयात, चार कॅबचालकांची याचिका; मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावाकांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार, नाफेड कडून कांदा पुरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हा कांदा बाजारात आला तर किलोमागे सरासरी दोन ते पाच रुपयांचा फरक पडू शकतो, असे कांदा व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. मात्र, हा कांदा मुंबई बाजारात कधी पोहोचेल याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे सांगण्यात येते. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर एका महिन्यात २८ टक्क्यांहून अधिक वाढून २५ ऑगस्ट रोजी ४४.७२ रुपये होता .

Maharashtra TimesMahalaxmi Papamani : साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?राज्यात साखरेच्या साठ्यावर निर्बंध

राज्यात साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने साखरेच्या साठ्यावर कठोर निर्बंध लागू केले आहेत. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू असणार आहेत. याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसृत केलेल्या आदेशानुसार कोणत्याही साखर विक्रेत्याला साखरेचा साठा प्राप्त झाल्यापासून तो ३० दिवसांपेक्षा जास्त काळ बाळगता येणार नाही. एका वेळी ४,००० क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, सर्व व्यापाऱ्यांना साठ्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या वेबपोर्टलवर जाहीर करून ती अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा