• Mon. Jun 29th, 2026

    भीमराव कांबळेला मृत्युदंड, चिमुरडीच्या कुटुंबाला अश्रू अनावर, आरोपीला उद्देशून न्यायमूर्तींनी तीन शब्द काढले, उपस्थित हेलावले

    ByMH LIVE NEWS

    Jun 29, 2026 #Advocate Ajay Misar, #Bhimrao Kamble, #Bhimrao Prabhakar Kamble, #Bhor POCSO Case Pune, #crime batmya, #Crime News, #crime news marathi, #Criminal News Pune Today, #Fast Track Court Maharashtra, #Landmark Judgment Death Penalty, #Latest Marathi News, #Maharahstra Times, #maharashtra times, #marathi batmya, #Marathi News, #Nasrapur Case Bhimrao Kamble gets Death Penalty, #Nasrapur Case Death Penalty, #Nasrapur Case marathi news, #Nasrapur Case Verdict, #Nasrapur Case Verdict Update, #Nasrapur Murder Case Status, #POCSO Act Case Pune, #pune batmya, #Pune Bhor Nasrapur Case Latest Updates, #Pune Court Verdict, #pune crime news, #Pune News, #pune news in marathi, #Pune Rural Police Investigation, #Sandeep Singh Gill IPS, #Special Judge SR Salunke, #Vijaymala Pawar Police, #क्राइम न्यूज मराठी, #दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा, #नसरापूर केस फाशीची शिक्षा, #नसरापूर चिमुरडी अत्याचार, #नसरापूर प्रकरण निकाल, #नसरापूर प्रकरण भीमराव कांबळे यांना फाशीची शिक्षा, #पुणे क्राईम न्यूज, #पुणे ग्रामीण पोलीस, #पुणे ताज्या बातम्या, #पुणे बातम्या, #पुणे-भोर-नसरापूर प्रकरण लेटेस्ट अपडेट, #फास्ट ट्रॅक कोर्ट निकाल, #बाललैंगिक अत्याचार खटला, #भीमराव कांबळे, #भीमराव प्रभाकर कांबळे, #भोर पोक्सो कायदा गुन्हे, #मराठी बातम्या, #महाराष्ट्र टाइम्स, #विशेष सरकारी वकील अजय मिसर
    भीमराव कांबळेला मृत्युदंड, चिमुरडीच्या कुटुंबाला अश्रू अनावर, आरोपीला उद्देशून न्यायमूर्तींनी तीन शब्द काढले, उपस्थित हेलावले

    Bhimrao Kamble : शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी ‘आता फासावर चढा’ असे शब्द भीमरावला उद्देशून काढल्याची माहिती आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आपल्या लेकीवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या नराधमाला मृत्युदंड झाल्याचे पाहून कुटुंबाला अश्रू अनावर झाले. तर शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी ‘आता फासावर चढा’ असे शब्द भीमरावला उद्देशून काढले. चिमुरडीला न्याय मिळाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

    मृत्युदंड देण्यामागे अनेक कारणे

    भोर तालुक्यातील चिमुरडीवर अत्याचार करुन हत्या झाल्याच्या प्रकरणात निकाल वाचन करताना न्यायमूर्ती म्हणाले की, “आरोपीचा पूर्वेतिहास अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. स्वतःची वासना शमवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचं सिद्ध झालं आहे. आरोपीचे वय ६५ वर्षे आहे, पण त्याला दया दाखवता येऊ शकत नाही. कारण या वयातही त्याच्यातील वासना कायम आहे. या गुन्ह्यात मृत्युदंड देण्यामागे अनेक कारणे आहेत. आरोपीचे कृत्य अनकॉमन आहे. ही घटना घडली त्यावेळी पीडित चिमुरडी असहाय्य होती. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आरोपीला कसलीही भीती नव्हती” असंही न्यायमूर्ती पुढे म्हणाले.
    Maharashtra TimesSiya Goyal : महाबळेश्वरला केतनसोबत एकाच खोलीत राहावं लागणार, प्रसंग टाळण्यासाठी सियाने 18 जूनचाच प्लॅन रचला, तपासात धक्कादायक माहिती

    “फाशीची शिक्षाही अपुरी पडेल”

    “पीडिता अवघी तीन वर्षांची होती. हत्येनंतरही भीमरावने तिच्यावर अत्याचार सुरु ठेवले. लैंगिक अत्याचार झाल्याचं शव विच्छेदन अहवालातही सिद्ध झालं आहे. चिमुरडी जिवंत राहील, असा पर्यायच आरोपीने ठेवला नाही. आरोपीला आजन्म कारावासच काय, तर फाशीची शिक्षाही अपुरी पडेल. आरोपीने सुधारण्याची पातळी सोडलेली आहे. याआधी ५३ व्या वर्षी कुटुंबातील मुलीवर अत्याचार केला होता, तर वृद्ध महिलेवरही हल्ला. हे दुर्मिळात दुर्मीळ प्रकरण आहे.” असं न्यायमूर्तींनी नमूद केलं

    VIDEO | ‘उद्धव ठाकरे बांडगुळासारखे आहेत का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा’

    Maharashtra TimesMumbai Crime : गिरगावात देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त, मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रीची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रंगेहाथ सापडला

    चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

    “ही शिक्षा एका गुन्ह्यातील आरोपीला नाही तर विकृत मानसिकतेच्या लोकांसाठी आहे. अनेक मुली आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी केली. जास्त फॉरेन्सिक वॅन सध्या फिरत आहेत. पुरावे योग्य आणि महत्त्वपूर्ण ठरत आहेत. न्याय हा ठळक दिसला पाहिजे, तो आज दिसला. यामुळे कायद्याचा जरब बसेल. केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवणार म्हणजे काय, ते नसरापूर प्रकरणात दिसले. लांडग्यांच्या नांग्या ठेवायचे काम या प्रकरणी दिसले. लोकांना लक्षात आले पाहिजे. प्रलंबित केसमध्ये पण दिसले पाहिजे” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा